तुमसर : शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधून त्या सोडवून घेण्यासाठी तुमसर तालुका काळी-पिवळी टॅक्सी चालक मालक संघटनेच्याशिष्टमंडळ केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. काळी पिवळीचे 'परमिट रिनीवल' होईपर्यंत टॅक्सी चालविण्याची मंजुरी देवून सुशिक्षित बेरोजगारांना बँकेची किस्त भरून परिवार जणांचे उदरनिर्वाह करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष मनोहर बिसने यांनी केले. गडकरी यांनी महाराष्ट्र शासनाकडे निवेदन पाठविण्याचा सल्ला देत संबंधित मंत्र्याशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळात अनवर तुरक, जावेद कुरैशी, सचिर कुरैशी, नितीन समरीत, भाऊराव नगरे, संतोष साखरे, निखिल नान्हे, प्रमोद समरीत, जयवंत कारेमोरे, अन्नु कुरैशी, देवेश वर्मा, सलाम तुरक, रूपेश खोब्रागडे, जुबेर कुरैशी, दिपक चिंचखेडे, गौतम गजभिये, परसराम साखरवाडे, तामीर शेख, लक्ष्मीकांत तुळणकर, विजय महाकाळकर यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
टॅक्सी चालकांची गडकरींसोबत चर्चा
By admin | Updated: February 28, 2016 00:53 IST