शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर एमआयडीसीत उद्योग दिले भाडेतत्त्वावर!

By admin | Updated: June 17, 2016 00:34 IST

तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे एमआयडीसीत कारखान्याची परस्पर विक्री, कारखाना भाडेतत्वावर देणे, भूखंडाची परस्पर विक्री करण्यात आले.

भूखंडाची परस्पर विक्री : प्रदूषण नियंत्रण मंडळ अनभिज्ञमोहन भोयर तुमसरतुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे एमआयडीसीत कारखान्याची परस्पर विक्री, कारखाना भाडेतत्वावर देणे, भूखंडाची परस्पर विक्री करण्यात आले. अनेक वर्षापासून या जागेवर उद्योगही सुरू झालेले नाही. तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर देव्हाडी येथे सन १९९० मध्ये एमआयडीसी स्थापन झाली होती. शेतकऱ्यांकडून कवडीमोल किमतीत शेती खरेदी करण्यात आली. गाजावाजा करून उद्योगधंदे येणार अशा घोषणा झाल्या. परंतु मागील २६ वर्षापासून येथे एकही मोठा उद्योग स्थापन झाला नाही. केवळ पाच उद्योगधंदे येथे सुरु आहेत. उर्वरीत भूखंड रिकामेच आहेत.वर्षभरापूर्वी एका उद्योजकाने भाडेतत्वावर उद्योग घेतला. नियमानुसार भाडे तत्वावर उद्योग देता येत नसताना परस्पर भाडे तत्वावर हा उद्योग दिला आहे. अपवादात्मकवेळी एमआयडीसीकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. याकरिता शासनाच्या परवानगीची गरज लागते. भाडेतत्वावर घेतलेला हा उद्योग केवळ रात्रीच सुरू असतो. देव्हाडी येथे रात्री धुराचे लोळ दिसतात. त्याला लागूनच नागरिकांची वस्ती आहे. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करते हा प्रश्न येथे उपस्थित होतो.भूखंडाची विक्रीया एमआयडीसीत भूखंडाची परस्पर विक्री करण्यात आली असून भूखंड एकाच्या नावाने व उद्योग दुसऱ्याने सुरु केला आहे. या एमआयडीसीत मॅग्नीजवर आधारित उद्योगच सुरु आहेत. इतर उद्योग बंद आहेत. नियमानुसार भूखंडाची विक्री करता येत नसताना दोन्ही उद्योजकांनी सामंजस्याने हा प्रकार केला आहे. शासनाची दिशाभूल करणारा हा प्रकार असून याबाबत संबंधित विभागाने चौकशी अद्यापपावेतो केली नाही. १५ ते २० एकरात एमआयडीसी आहे. शासनाच्या नियमानुसार भूखंड घेतल्यावर तीन वर्षात उद्योग सुरु करण्याचा नियम आहे. परंतु येथे २५ वर्षापासून उद्योग सुरु नाही.रिकाम्या जागेवर एका उद्योजकाने झाडांची नर्सरी लावली आहे. दुसरीकडे एमआयडीसीत भूखंड रिकामे नाही असे सांगतात. काही उद्योगांना येथे मोठे भूखंड देण्यात आले. परंतु अतिरिक्त जागा रिकामीच पडून आहे. देव्हाडी एमआयडीसीत महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचा पाणी फिल्टर प्लांट तयार केला आहे. हा फिल्टर प्लांट बंदच आहे. १० ते १२ गावांना येथून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याकरिता हा फिल्टर प्लांट बांधण्यात आला होता. उद्योगाकरिता येथे भूखंड देण्याचा नियम आहे. देव्हाडी एमआयडीसीतील या प्रकरणाची चौकशी केली तर अनेक अनियमित कामे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.