शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर बाजार समिती झाली ‘कॅशलेस’

By admin | Updated: January 2, 2017 01:23 IST

नोटाबंदीमुळे केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहार सुरू करण्याचे आवाहन केले होते.

तुमसर : नोटाबंदीमुळे केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहार सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत ८ नोव्हेंबरनंतर १५ कोटी रूपयांची धान खरेदी कॅशलेस व्यवहाराअंतर्गत धनादेशाने करण्यात आले. ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनात रद्द करण्याची घोषणा झाली त्यावेळी तुमसर बाजार समितीमध्ये धानाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. राज्यात धान तथा तांदूळ खरेदी-विक्रीत तुमसर बाजार समिती अव्वलस्थानी आहे. मध्यप्रदेशातूनही येथे धान विक्रीकरिता येते. सुरूवातीला उधारी व काही प्रमाणात रोखीने धान खरेदी केली जात होती. परंतु हजारो शेतकऱ्यांना नगदी रक्कम कुठून देणार असा प्रश्न व्यापारी तथा अडत्या, दलालांना पडला होता. या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी कॅशलेसचा तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांना धनादेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. अडत्या, व्यापारी, मापारी यांनी धनादेश देण्याची सुरूवात केली. सुरूवातीला शेतकऱ्यांनी विरोध केला, परंतु कॅशलेस व्यवहार हाच पर्याय असल्याचे समजावून सांगितल्यावर शेतकऱ्यांनी होकार दिला. कॅशलेस व्यवहाराकरिता तुमसर बाजार समितीमध्ये सर्वांना सूचना देण्यात आली होती. शेतकऱ्यांची खाती बँकेत उघडण्यात आली. त्यासाठी बँक अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. स्टेट बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. आतापर्यंत १५ कोटी रूपयांचे चुकारे धनादेशाद्वारे देण्यात आले. मार्च महिन्यापर्यंत ६० कोटींची धान विक्री होण्याची शक्यता आहे. कॅशलेस व्यवहाराकरिता संचालक मंडळ व व्यापारी, अडते, दलाल यांच्याशी चर्चा करून सामूहिक प्रयत्न केले. येणाऱ्या काळात सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत होईल, असे बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी) कॅशलेस व्यवहाराकरीता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. शेतकऱ्यांची खाती उघडण्यात आली. आता शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पारदर्शी व्यवहार व तातडीने पैसे देण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. -अनिल भोयर, सचिव बाजार समिती तुमसर.