शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

तंटामुक्त गाव समिती नावापुरतीच

By admin | Updated: August 12, 2015 00:33 IST

कायदा व सुव्यवस्था कायम राहून सर्व सामान्य जनतेला गाव पातळीवर न्याय मिळावा हा उदात्त हेतु डोळयापुढ ठेवून महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची स्थापना केली.

गावागावांतील प्रकार : प्रशासनाने दखल घेण्याची गरजबारव्हा : कायदा व सुव्यवस्था कायम राहून सर्व सामान्य जनतेला गाव पातळीवर न्याय मिळावा हा उदात्त हेतु डोळयापुढ ठेवून महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची स्थापना केली. त्यासाठी प्रोत्साहनपर बक्षिसांची खैरात सुध्दा वाटली. बक्षिसांसाठी अनेक गावांची चांगली मोहीम राबवून तर काहीनी कागदी घोडे रंगवून बक्षिसांवर ताव मारला व पुरस्कार प्राप्त केला मात्र अनेक गावात तंटामुक्त गाव समित्या शोभेच्या वस्तू बनुन नावापुरत्याच उरल्या असून झोलबा पाटलाचा वाडा बनल्या आहेत.२९ सदस्य असलेल्या तंटामुक्त समितीमध्ये अनेक पदसिध्द पदाधिकाऱ्यांचा भरणा असतो. मात्र काही गावांध्मये चार-चार वर्षे लोटूनही अध्यक्ष बदललेल्या नाही. मागील वर्षी अतितटीच्या संघर्षानंतर काही गावात वन मॅन शोचा कायापालट होवून अध्यक्ष, सदस्य बदलण्यात आले. मात्र नाममात्र ह्या सदस्याचा भरणा फक्त फलकावर देखाव्या व्यतिरिक्त बेकाम असल्याची अनुभूती प्रत्येक गावात न्यायपिडीतांना येत आहे. पोलीस ठाण्यात चकरा मारुन पोलिसांचे खिसे गरम करुन न्यायालयाच्या खेटा मारण्यापेक्षा गावातच न्याय मिळेल ही अपेक्षाच या कचऱ्यात लुप्त झाल्याचा प्रत्यय आता जनतेला येत आहे. तंटामुक्ती हे धोरण उदात्त असले तरी कित्येक गावात मात्र तळिरामांच्या पुढे हतबल होऊन अध्यक्ष निवडीवर सुशिक्षितांना खो बसतो व न्याय प्रणाली आणि खऱ्या सेवेचे हनन होते. ती अशा लोकांचे हातात जाते ज्यांना कायद्याचे व न्यायप्रणालीचे ज्ञानच नसते. तंटामुक्त समितीला गावातील तंटे सोडविण्याव्यतिरिक्त गावातील ग्रामस्थांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांच्या निराकरणास ग्रामपंचायतला हातभार द्यावा लागतो. मात्र काही गावात सुस्त पदाधिकाऱ्याना सभेलाच हजर राहण्यास वेळ राहत नाही. ते यापलिकडील गोष्टीचा काय करणार असाही सवाल जनता करीत आहे.कधीकधी आकस्मिक तंटे उद्भवल्यास ते निराकरणासाठी सभा बोलविण्यात येते. मात्र कित्येक ठिकाणी अध्यक्ष आले तर सरपंच व सदस्य वेळेवर येत नाही. अशावेळी निर्माण झालेले तंटे वेळेवर सोडविण्यात येत नाही. तंटे गावातच सुटल्यास शासनाकडून निकषानुसार पुरस्कार मिळतो. मागील आठ वर्षात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीना तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाले आहेत. मात्र पुरस्काराचा निधीही योग्य प्रकारे खर्च केले जात नसल्याची ग्रामस्थांमध्ये ओरड आहे.गावातील तंटे गावातच सुटले पाहिजे यासाठी निर्माण करण्यात आलेली तंमुसची योजना स्थानिक प्रशासनाच्या दिरंगाईमुळे लोप पावत चालली आहे काय ? असा भास निर्माण होत आहे. याकडे गृह विभागाने गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)