शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

तंटामुक्त समित्या नावालाच!

By admin | Updated: May 24, 2016 01:12 IST

शासनातर्फे महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबविली जात आहे. गावात क्षुल्लक कारणांवरून होणारे तंटे गावातच संपुष्टात यावे ..

शासनाचे दुर्लक्ष : प्रशासकीय कामात उणिवातुमसर : शासनातर्फे महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबविली जात आहे. गावात क्षुल्लक कारणांवरून होणारे तंटे गावातच संपुष्टात यावे आणि गावाला शांततेकडून समृद्धीकडे न्यावे, हा या योजनेमागचा उद्देश आहे. शासन तंटामुक्त गावांना लाखो रूपयाचे प्रोत्साहनपर बक्षीसही देते. मात्र काही गावांचा अपवाद वगळता बहुतांश गावातील तंटामुक्त समित्या केवळ कागदावरच दिसत आहेत.गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटवून गावाला शांततेकडून समृद्धीकडे नेण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने १५ आॅगस्ट २००७ पासून ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव’ योजना सुरू केली. मात्र प्रशासकीय कामकाजातील उणीवा, या योजनेत अडसर ठरत आहे. या उणीवा दूर केल्यास या योजनेची संकल्पना खऱ्याअर्थाने यशस्वी ठरण्याची शक्यता आहे. ही मोहीम राबविताना सहज उपलब्ध होणारी दारू, ही सर्वात मोठी अडचण निर्माण करीत आहे. अनेक गावांत दारूभट्ट्या सुरू आहे. अनेक गावांतील बहुतांश तंटे हे दारूमुळेच होतात, हे स्पष्ट होत आहे. मात्र केवळ महसूल मिळावा म्हणून शासन गावात दारू विक्रीचे परवाने देऊन विक्री वाढावी, यासाठी सतत प्रयत्न करीत असते, ही दुर्दैवाची बाब आहे. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या कृपादृष्टीने हातभट्ट्या व अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गावागावात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्था बिघडून फौजदारी स्वरूपाचे तंटे निर्माण होत आहे. तरीही शासन स्तरावर जिल्ह्यात दारूबंदीसाठी कुठलेही प्रयत्न होत नाही. शासनाने या बाबीचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. बहुतांश तंटे हे दारूमुळेच होत असल्याचे पोलीस ठाण्यात येत असलेल्या तक्रारीवरून दिसून येतात. गावातील काही तंटे रस्ते, नाल्या, झांज्या सरकविण्यावरून किंवा अतिक्रमण सरकविण्यावरून होतात. यात ग्रामस्थ जेवढे जबाबदार असतात, तेवढाच स्थानिक ग्रामपंचयतीचा गलथान कारभार करणीभूत ठरत आहे.ग्रामपंचायत हद्दीचे नकाशे, रस्त्याचे नकाशे, लोकांच्या जागेचे मिळकतीचे दस्तऐवज, वेळोवेळी खरेदी-विक्री होत असलेल्या नोंदीचे संपूर्ण दस्तऐवज ग्रामपंचायतीत उपलब्ध नसतात. गावातील अतिक्रमण काढण्याची कारवाई होत नाही. यामुळेसुद्धा तंटे होतात. बहुतांश महसुली आणि दिवाणी तंटे शेताच्या रस्त्यावरून, धुऱ्यावरून, मोजणीवरून, गायरान चारण्याच्या अतिक्रमणावरून, शेताचे पेरवे लिहिन्यावरूनही होतात. यासाठी प्रशासकीय उणीवाच अधिक कारणीभूत ठरत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी दर तीन वर्षांनी होऊन प्रत्येक शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्याप्रमाणे जमिनीची हद्द कायम ठेवून वहिवाट, खून गोटे अद्ययावत करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. मात्र शासनाने ब्रिटीश काळात सन १९३० मध्ये केलेल्या मोजणीनंतर शेताची मोजणीच केली नाही. परिणामी बहुतांश शेतांचे खून गोटे, वहिवाट पाण्यामुळे वाहून गेल्या आहे. त्यामुळे भूमीअभिलेख मोजणी निरीक्षकाच्या मोजणीत संभ्रम निर्माण होऊन त्याचे रूपांतर महसुली आणि दिवाणी तंट्यात होत आहे. (तालुका प्रतिनिधी)