शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीतून शेतकऱ्यांना विकासाचा मंत्र देणारे तानाजी गायधने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 05:00 IST

महाराष्ट्र राज्य कृषी, कृषी संलग्नित क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना २०१८ व २०१९ या वर्षाचे पुरस्कार बुधवारी घोषित झाले. यात भंडारा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यात चिखली येथील गोपाल गायधने यांना सेंद्रिय शेतीसाठी कृषिभूषण पुरस्कार घोषित झाला आहे. या पुरस्कारामागे त्यांची प्रचंड मेहनत, चिकाटी आणि इतर शेतकऱ्यांना सामावून घेण्याची क्षमता महत्त्वाची ठरली आहे.

ठळक मुद्देकृषिभूषण पुरस्कार : विषमुक्त शेतीचा शासनाकडून गौरव

संतोष जाधवरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराने जमिनीचा पोत बिघडण्यासोबतच मानवी आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत एका शेतकऱ्याने विषमुक्त शेतीचा ध्यास घेतला. स्वत: आपल्या शेतात प्रयोग करून इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन केले. आज या शेतकऱ्याच्या विषमुक्त शेती प्रयोगावर महाराष्ट्र शासनानेही शिक्कामोर्तब केले. कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार घोषित करून या शेतीपद्धतीचा गौरव केला. सेंद्रिय शेतीतून विकासाचा मंत्र देणारा हा शेतकरी आहे, भंडारा तालुक्यातील चिखली येथील तानाजी गोपाल गायधने. महाराष्ट्र राज्य कृषी, कृषी संलग्नित क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना २०१८ व २०१९ या वर्षाचे पुरस्कार बुधवारी घोषित झाले. यात भंडारा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यात चिखली येथील गोपाल गायधने यांना सेंद्रिय शेतीसाठी कृषिभूषण पुरस्कार घोषित झाला आहे. या पुरस्कारामागे त्यांची प्रचंड मेहनत, चिकाटी आणि इतर शेतकऱ्यांना सामावून घेण्याची क्षमता महत्त्वाची ठरली आहे. २०१४ पूर्वी गायधने यांनी सेंद्रिय शेतीचा ध्यास घेतला. आपल्या गावातच गटाची स्थापना केली. ५० जणांचा शेतकरी गट तयार करून सेंद्रिय शेतीचे धडे घेण्यास सुरुवात केली. आत्मा अंतर्गत झालेल्या प्रशिक्षणात ब्रह्मदे जीवनामृत दशपर्णी अर्क तयार केला. त्यानंतर गांडूळ खतनिर्मिती करून सेंद्रिय शेतीसाठी काय करता येईल याची माहिती मिळविणे सुरू केले. राज्यातच नव्हे तर बाहेरील राज्यातही अभ्यास दौरा करून त्यांनी सेंद्रिय शेतीबाबत अद्यावत ज्ञान संपादित केले. उत्पादन खर्च कमी आणि कीड नियंत्रणासाठी अल्प खर्च यामुळे त्यांचा हा प्रयोग यशस्वी होऊ लागला. इतर शेतकरीही त्यांचे मार्गदर्शन घेऊ लागले. शेतीला पूरक म्हणून त्यांनी रोपवाटिका उभारली. सौरऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या समस्येवर मात केली. फळबाग लागवड योजनेतून शेतात फळझाडांची लागवड केली. आंबा, चिकू, शेवगा आज त्यांच्या शेतात डोलत आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळून सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त शेती करून त्यांनी भंडारा जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण केला. त्याचाच शासनाने आता गौरव केला आहे. 

अभ्यासदौऱ्यातून मिळविली माहिती सेंद्रिय शेती मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांनी आपल्या सहकारी शेतकऱ्यांसोबत विविध ठिकाणचे दौरे केले. त्यात जळगाव, नाशिक, उरळीकांचन येथे जाऊन प्रत्यक्ष माहिती घेतली. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत राष्ट्रीय जैविक कृषी संस्था सिक्कीम येथे सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतले. त्याचसोबत रायपूर, हरिद्वार येथेही प्रशिक्षण घेतले. त्यांनी ही बाब आपल्यापुरतीच मर्यादित न ठेवता शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांनाही प्रशिक्षणात सहभागी करून घेतले. 

शेतातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी एकात्मिक कीडरोग नियंत्रण आवश्यक आहे. आमच्या शेतात भाजीपाला व इतर पिकांमध्ये पक्षी थांबे तयार केले. औषधी वनस्पतीचा वापर करून दशपर्णी अर्क जीवनामृत तयार करून फवारले. एकीकडे खर्चात बचत झाली, तर दुसरीकडे जमिनीचा पोत सुधारला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषमुक्त अन्न तयार करण्यास हातभार लागला. कृषी विभागाचे मिळणारे मार्गदर्शनही आम्हाला मोलाचे ठरले. -तानाजी गायधने,  कृषिभूषण पुरस्कार प्राप्त

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी