शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांच्या’ प्रशिक्षणातून घडताहेत प्रतिभावान खेळाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:16 IST

निलज खुर्द येथील मंगल भोयर यांच्या अ‍ॅथलेटीक्सच्या प्रशिक्षणातून मुलगा राष्ट्रपाल राष्ट्रीय पातळीवर चमकला, नोकरी लागली.

ठळक मुद्देमंगल भोयर यांचा पुढाकार : अनेक खेळाडूंना मिळाला रोजगार

आॅनलाईन लोकमतकरडी (पालोरा) : निलज खुर्द येथील मंगल भोयर यांच्या अ‍ॅथलेटीक्सच्या प्रशिक्षणातून मुलगा राष्ट्रपाल राष्ट्रीय पातळीवर चमकला, नोकरी लागली. त्यांच्या मेहनतीचे यश पंचक्रोशीत पोहचले अन् गरीबांची मुले त्यांचेकडे सरावासाठी आज येवू लागली.त्यांच्या नि:शुल्क प्रशिक्षणातून अनेकांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील मैदान गाजविले. काहींना पोलीस व आर्मीची नोकरी मिळाली आहे. ३५ ते ४० मुले त्यांच्याकडे सराव करीत असून सकाळी व सायंकाळी दोन तासांचे प्रशिक्षण दिले जात आहे. निलजचे मैदान होतकरुंसाठी वरदान ठरू पाहत आहे.जेमतेम नववीचे शिक्षण घेतलेल्या मंगल गणाची भोयर यांची २०१० पासून मुलांना अ‍ॅथलेटीक्सचे प्रशिक्षण देण्यासाठी स्वत:ला समर्पीत केले. त्यांच्या प्रशिक्षणातून क्रीडा प्रबोधनीत निशा भोयर, दिपाली आगाशे, आम्रपाली भोयर, रविता कनपटे, रितीक पंचबुद्धे, कमलेश भोयर, सहयोग कनपटे, अश्विन भोयर आदी प्रतिभावंत प्रशिक्षण घेत आहेत. तर जानेवारी २०१८ मध्ये दोघांची आर्मीसाठी तर दोघांची पोलीस विभागात निवड झाली.आठ ते दहा विद्यार्थी राज्य व राष्ट्रीयस्तरावर चमकले. वर्षभरापूर्वी त्यांनी निलज येथे संकुलन क्रीडा मंडळाची स्थापना करून सध्या या मंडळाचे माध्यमातून रोज ३५ ते ४० विद्यार्थी अ‍ॅथलेटीक्सचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणामध्ये ४०० मीटर ट्रॅक, १००, २०० मिटर ट्रॅक, लांब उडी, उंच उडी, ३० मिटर शटल रनिंग व अन्य प्रकारांचा समावेश आहे. क्रीडा प्रशिक्षक अ.वा. बुद्धे यांच्या कार्याने आपण प्रेरीत झाल्याचे ते अभिमानाने सांगत आहेत.एशियन सायकलींग कप स्पर्धेत ब्रांझ पदक विजेती आंतरराष्ट्रीय सायकलपटू सुशिकला आगाशे याच गावातील आहे.राज्यस्तरीय स्पर्धांसाठी सात मुलांची निवडभोयर यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या १० ते १४ वर्षे वयोगटातील सात विद्यार्थ्यांची रायगड येथील राज्यस्तरीय अ‍ॅथलेटीक्स स्पर्र्धेसाठी निवड झाली. यात यश तिजारे, शुभम शेंडे, कमलेश भोयर, देवेश कुकडे, आयुष मते, सचिन डाकरे, स्नेहल बांते यांचा समावेश होता.रोज सकाळी व सायंकाळी दोन तास नि:शुल्क अ‍ॅथलेटीक्सचे प्रशिक्षण देण्यात येते. या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार झाले. प्रशिक्षणासाठी आधुनिक सुसज्ज क्रीडांगणाची गरज आहे.-मंगल भोयर,अ‍ॅथलेटीक्स प्रशिक्षक, निलज खुर्द.