शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सिहोरा परिसरातील तलाठी ‘आऊट आॅफ कव्हरेज’

By admin | Updated: January 31, 2015 23:14 IST

ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे थेट संपर्कात येणाऱ्या सिहोरा परिसरातील मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयात २९ ला फेरफटका मारला असता कार्यलयीन वेळेत तलाठी गैरहजर होते.

रंजित चिंचखेडे - चुल्हाड (सिहोरा)ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे थेट संपर्कात येणाऱ्या सिहोरा परिसरातील मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयात २९ ला फेरफटका मारला असता कार्यलयीन वेळेत तलाठी गैरहजर होते. त्यांचे बहुतांश भ्रमणध्वनी 'आऊट आॅफ कव्हरेज' असल्याचे दिसून आले. यामुळे शेतकऱ्यांचे कामे प्रभावित होत आहे.ग्रामीण भागात तलाठी कार्यालय शेतकऱ्यांच्या थेट संपर्कात येणारी आहे. या कार्यालयात शेतकऱ्यांचे शेती संदर्भात महत्वाचे दस्तऐवज आहेत. सिहोरा परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयात हे महत्वाचे दस्तऐवज फेरफटका मारला असता सुरक्षीत नाही, असे दिसून आले आहेत. तलाठी कार्यालय भाड्याच्या घरात आहे. या कार्यालयाची अवस्था जनावरांचे कोंडवाडे असल्याचे दिसत आहेत. वीज, पिण्याचे पाणी तथा बैठकीची व्यवस्था नाही. शासनाचे संबंधित कार्यालय 'हायटेक' होत आहेत. परंतु तलाठी कार्यालय याला अपवाद आहेत. ज्या घरात तलाठी कार्यालय आहेत, अशा कार्यालयाचे मुख्य दरवाजे जीर्ण झाली आहेत. या दरवाज्यातून सहज प्रवेश करता येवू शकतो. राज्य शासनाला महसूल देणारा हाच विभाग महत्वाचा आहे. परंतु या तलाठी कार्यालयाची स्वतंत्र इमारत नाही. यामुळे एकाच खोलीत सारे काही असे चित्र आहे. या एकाच खोलीत प्रशसकीय कामे, तलाठीची खुर्ची, कोतवाल, पिण्याचे पाणी, पंखा, बैठकीची व्यवस्था आहे. वन रूम किचन अशी अवस्था झाली आहे. बहुतांश तलाठी कार्यालयात विजेची सोय नाही. याशिवाय तलाठी कार्यालयांना देण्यात आलेली कुलर बंद पडली आहेत. या तलाठी कार्यालयांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी निर्मलग्राम योजनेला हरताळ फासला आहे. गावागावात स्वच्छ भारत मिशनच ासंदेश पोहचविण्यासाठी याच महसूल विभागाने सहभाग घेतला आहे. तहसील कार्यालयात आवारात मोठे फलक लावण्यात आली आहेत. परंतु दिव्याखाली अंधार असा चित्र निदर्शनास आलेला आहे. तलाठी कार्यालयात शौचालय नाहीत. घरा घरात शौचालय बांधकामासाठी यंत्रणा गुुंतली आहेत. परंतु तलाठी कार्यालयात ही अट लागू करण्यात आली नाही. या कार्यालयात शौचालयाची शक्ती नाही. कार्यालयीन कामे करताना शौच विधीसाठी तलाठी आणि शेतकऱ्यांना बाहेरचा मार्ग पत्करावा लागतो. शासकीय या कार्यालयाला महत्वाकांक्षी उपक्रमातून वगळण्यात आले आहे. खाजगी घरात सुरू असणाऱ्या या कार्यालयाचे भाडा अल्प आहे. दरम्यान २९ ला सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत लोकमतने सिहोरा परिसरातील मंडळ अधिकारी तथा तलाठी कार्यालयांना भेट दिली. अनेक तलाठी अनुपस्थित होते. या कार्यालयात कोतवाल प्रशासकीय कारभारात व्यस्त होते. दोन-तीन तलाठी कार्यालयात हजर होते तर काही तलाठी कार्यालय कुलूप बंद दिसून आली. दरम्यान कोतवाल यांना तलाठी संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. तहसील कार्यालयात दस्तऐवज संगणकृत करण्यात येत असल्याने यात व्यस्त असल्याची माहिती मिळाली. अनुपस्थितीला तलाठी दोषी नाहीत. परंतु धक्कादायक माहिती मिळाली आहे. कार्यालयीन वेळेत तलाठी हजेरी रजिस्टर नाही. याशिवाय कुठे गेल्यास हलचल रजिस्टर नाही. यामुळे तलाठी कुठे जातो. हे सांगणारा कुणी नाही. यामुळे शेतकरी तलाठी कार्यालयात प्रतिक्षत्त करीत असतो. दरम्यान तलाठी यांना अनेक शासकीय कामे देण्यात आली आहे. शेतीची चोरटी वाहतुक थांबविण्यासाठी नदी पात्रात भ्रमती करण्याचे सांगण्यात आले आहे. वरिष्ठाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना तलाठ्यांची दमछाक होत आहे तर शेतकरी याच तलाठ्यांवर अनुपस्थितीचे फटाके फोडत आहेत. या संदर्भात विचारणा करण्यासाठी शेतकरी भ्रमणध्वनीवर संपर्क करीत आहेत. भ्रमणध्वनी आऊट आॅफ कव्हरेज सांगताच शेतकरी माघारी परत जात आहेत. यामुळे ज्यांच्या सेवेसाठी ही कार्यालय आहेत. त्याच शेतकऱ्यांची गोची होत आहेत.