शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या कडाक्यापासून जनावरांना वाचवण्यासाठी करा हे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 13:13 IST

Bhandara : ३६ अंशांवर पोहोचले भंडारा जिल्ह्याचे तापमान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाढत्या उन्हामुळे पशुपालकांना नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. दुभत्या जनावरांना उन्हाचा त्रास झाल्यास दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात पशुपालकांनी जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. जनावरांच्या चारा, पाण्याचे नियोजन तसेच गोठ्यातील तापमान नियंत्रणासाठी पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायाकडे पाहिले जाते. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान वाढत आहे. वाढत्या उन्हापासून जनावरांचे संरक्षण करणे आवश्यक असते. उन्हाळ्यात जनावरांच्या गोठ्याचे व आहाराचे व्यवस्थापन न केल्यास जनावरांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो.

तीव्र उष्णतेच्या लाटेचा दुग्ध व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. दुभती जनावरे जास्त दूधनिर्मिती करीत असल्यामुळे दूध निर्माण करताना शरीरात जास्तीची उष्णता निर्माण होते. परिणामी, दुभती जनावरे उन्हामुळे आजारी पडतात. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे दूध उत्पादनात १० ते २० टक्के घट येण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुपालकांनी वेळीच काळजी घेत चारा, पाणी व तापमानाचे नियोजन करणे हिताचे ठरणारे असते.

श्वानांचीही काळजी घ्याग्रामीण भागासह शहरात श्वान पाळणाऱ्यांची संख्या अधिक आहे. उन्हाळ्यात श्वानांनाही त्रास होण्याची शक्यता असते. अशा वेळी पशुपालकांनी योग्य खबरदारी घेऊन लसीकरणासह जनावरांचे तापमान नियंत्रित राहील, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे असते.

जनावरांची काय काळजी घ्याल?

  • उन्हाळ्यात जनावरांना भूक कमी • आणि तहान जास्त वाढते. त्यामुळे गुरांना मुबलक स्वच्छ पाणी द्यावे, साधारण तीन वेळा पाणी पिण्यास द्यावे, त्यामुळे जनावरांच्या शरीरातील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • पशुपालकांनी उन्हाळ्यात गुरांना २ हिरवा चारा खाण्यास द्यावा, तसेच चारा देताना तो कुट्टी करून दिल्यास जनावरांना खाण्यास मदत होते. याचबरोबर सुका चारा खाल्ल्याने जनावरांना पाण्याची गरज जास्त भासत असते. जर गुरांना पाण्यात मीठ आणि पीठ टाकून पिऊ घातल्यास ते अधिक फायदेशीर असते.

गुरांचे गोठे असावे स्वच्छ व हवेशीरउन्हाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. पशुपालकांनी गोठ्यात हवा खेळती ठेवावी, वेळोवेळी गोठा स्वच्छ ठेवावा, पाण्याच्या व चाऱ्याच्या वेळा पाळणे आवश्यक झाले आहे. याबाबत पशुपालकांनी लक्ष द्यावे.

"उन्हाळ्यात दाट सावलीच्या झाडाखाली, थंड गोठ्यात जनावरांची व्यवस्था करावी. वेळोवेळी लसीकरण करावे. उष्माघाताची लक्षणे दिसून आल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार करावा."- जगन्नाथ देशट्टीवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

टॅग्स :bhandara-acभंडाराSummer Specialसमर स्पेशल