शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शेतशिवार ‘हरितक्रांती’साठी गाळाचा आधार घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2017 00:21 IST

लोकसहभागाशिवाय विकास व योजना पूर्णत्वाला जाणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी शासनाच्या योजनेत सहभाग नोंदवित विकास मोहिमेला सहकार्य करा.

तहसीलदार राजीव शक्करवार : गाळमुक्त तलाव - गाळयुक्त शिवार कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लोकसहभागाशिवाय विकास व योजना पूर्णत्वाला जाणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी शासनाच्या योजनेत सहभाग नोंदवित विकास मोहिमेला सहकार्य करा. गाळमुक्त तलाव - गाळयुक्त शिवार योजनेला लोकसहभागाचा आधार देऊन तलाव व शिवार वाचवा, असे प्रतिपादन लाखनीचे तहसीलदार राजीव शक्करवार यांनी केले.पालांदुर येथे मामा तलावाच्या गाळमुक्त तलाव कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालांदूरच्या सरपंच शुभांगी मदनकर, कवलेवाडा सरपंच वैशाली खंडाईत, न्याहरवानीचे रत्नाकर नागलवाडे, दामाजी खंडाईत, ग्रामविस्तार अधिकारी एच.एम. बावनकर, नायब तहसीलदार विनोद थोरवे, नायब तहसीलदार शरद घारगडे, मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे, तलाठी नरेश पडोळे, तंमुस अध्यक्ष हेमराज कापसे, पोलीस पाटील रमेश कापसे, कोतवाल खंडाईत, पर्यावरणप्रेमी इद्रीस लद्धानी तथा ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी शक्करवार यांनी, तलावातील गाळ उपश्याने पाणीसाठा वाढून भूगर्भात पाणी जिरायला मोठी मदत होणार आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतशिवार सुपिक व्हायला वेळ लागणार नाही. एकाच योजनेतून दोन कामे शेतकऱ्यांकरिता यशस्वीरित्यापुढे येत आहेत. लाखनी तालुक्यात पहिल्या टप्प्यात सात गावांचा यात सहभाग करण्यात आला असून त्यात दैतमांगली, गडेगाव, सामेवाडा, पालांदूर, रेंगेपार (कोहळी), निलागोंदी, मानेगाव यांचा समावेश आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढलेला गाळ शेतशिवारात पोहचत आहे. कालपर्यंत सुमारे २,१९३ क्युमीकमिटर गाळ उपसून २५ हेक्टरमध्ये पोहचविण्यात आला. याकरिता शेतकरी हा आमचा गाभा असून त्याच्या उत्थानाकरिता शासनाचा व प्रशासनाचा प्रभावी माध्यम ठरत आहे. पालांदुरात आठवडाभर हा कार्यक्रम सुरु राहून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याकरिता प्रयत्न केला जाईल. याकरिता पालांदूरचे मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा योजनेचा लाभ घेत दुपारी ४ वाजेपर्यंत ७० ट्रॅक्टर गाळाची उचल केली आहे, हे विशेष.योजना योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. लोकसहभागातूनच कोणत्याही योजनेचे फलीत शक्य आहे. पुढील टप्प्यात ही योजना रोहयो अंतर्गत राबविली तर मजुरांना काम मिळून त्यांच्या आर्थिक उत्थानाला मदत होईल असे प्रतिपादन सरपंच शुभांगी मदनकर यांनी केले.दामाजी खंडाईत यांनी, ही योजना जुनीच आहे. सरकारने फक्त तीचे रूप बदलवीले आहे. ग्रामपंचायतच्या अधिकारात कलम ५१ नुसार पूर्वी सुरू होते. शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात लाभ मिळण्याकरिता महसूल विभागाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. लहान मोठ्या शेतकऱ्यांना गाळ मिळून योजनेची व्याप्ती वाढवावी, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला पालांदूर ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.