शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रांमध्ये सामाजिक परिवर्तनाची दखल घ्यावी

By admin | Updated: December 23, 2014 22:58 IST

सामाजिक शास्त्रांच्या आंतरसंबंधाची उकल करताना सामाजिक संशोधकांनी व अध्यापकांनी स्वत:ला विषयापुरते मर्यादित न ठेवता इतर सामाजिक शास्त्रांच्या विषय वस्तुला समजून घ्यावे.

भंडारा : सामाजिक शास्त्रांच्या आंतरसंबंधाची उकल करताना सामाजिक संशोधकांनी व अध्यापकांनी स्वत:ला विषयापुरते मर्यादित न ठेवता इतर सामाजिक शास्त्रांच्या विषय वस्तुला समजून घ्यावे. जेणे करून समाजामध्ये घडून येणाऱ्या सामाजिक परिवर्तनाचे विश्लेषन करणे शक्य होईल. परिणामी परिवर्तनातून उदयास येत असलेल्या समस्यांच्या सामना करण्यास आपण तयार होवू शकू, असे प्रतिपादन नागपूर विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी व्यक्त केले.येथील जे.एम. पटेल महाविद्यालयात आयोजित सामाजिक शास्त्रांच्या अध्ययन मंडळाचे उद्घाटन प्रसंगी डॉ. देशपांडे बोलत होते. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कडव, प्रा. डॉ. अमोल पदवाड, प्रा. सुमंत देशपांडे, नागपूर विद्यापिठाचे व्यवस्थापन समिती सदस्य महेंद्र निंबार्ते, प्रा. दिपक राऊत आदी उपस्थित होते. डॉ. देशपांडे म्हणाले, समाजशास्त्राचे सिद्धांत बदलत्या काळानुसार नव्याने विश्लेषित करण्याची गरज आहे. याप्रसंगी त्यांनी पटेल महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या गुणवत्ता पूर्ण शिक्षण व्यवस्थेचे कौतूक केले. प्राचार्य ढोमणे यांनी महाविद्यालयात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी डॉ. अमोल पदवाड आणि प्रा. सुमंत देशपांडे यांनी संपादित केलेल्या 'साक्षेप' या आंतरविद्याशाखीय पिअर रिव्हुव्ड जर्नलचे विमोचण करण्यात आले. डॉ. देशपांडे यांच्या हस्ते गृहअर्थशास्त्र हस्तकला व सामाजिक शास्त्र भित्ती प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रा. वझलवार, डॉ. प्रदीप मेश्राम, डॉ. कार्तिक पणीकर, डॉ. सिद्धार्थ मेश्राम, प्रा. अनिल भांडारकर, डॉ. शोभा घाडगे, डॉ. निशा पडोळे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)