पालांदूर (चौ.) : प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेला मानव समूह तसेच किशोरी व महिला वर्गाचे आरोग्याकडे, खानपानाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे एक सक्षम व सृदृढ महिला ही चांगल्या निरोगी बालकास जन्मास घालू शकत नाही. यासाठी किशोरी तसेच महिलांनी वैयक्तिक स्वच्छतेवर व सकस आहारावर भर द्यावे, असे प्रतिपादन वैद्यकीय अधिक्षक डॉ. एम. एम. कुंभरे यांनी केले.ग्रामीण रुग्णालय लाखनी व ग्रामीण रुग्णालय पालांदूर, राष्ट्रीय बाल स्वास्थ अभियान लाखनी तसेच जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पालांदूर (चौ.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आरोग्य अभियानाच्या अध्यक्षा सरपंच शुभांगी मदनकर, उद्घाटीका वैशाली खंडाईत, प्रमुख उपस्थिती डॉ. भुमेश्वरी भरत खंडाईत, अनिता नंदागवळी, आरती धकाते, प्रा. युवराज खोब्रागडे, शिवानी काटकर, सारिका वाघाडे, ललिता देशमुख, डॉ. एम. एम. कुंभरे, डॉ. अक्षरा थुल, डॉ. जसवंत जनबंधू, डॉ. राजश्री जनबंधू, डॉ. ढवळे, डॉ. नंदेश्वर, विनोद मेश्राम, टेंभुर्णे, वाडीभस्मे, बोंदरे, मेश्राम आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाला ८ ते ११ मधील किशोरवयीन मुली, जिल्हा परिषद हायस्कल तथा कनिष्ठ महाविद्यालय पालांदूर, सरस्वती विद्यालय पालांदूर, गोविंद विद्यालय पालांदूर, अंगणवाडी शिक्षीका, आशा वर्कर, स्तनदा माता व मोठ्या संख्येने किशोरी उपस्थित होत्या. यामध्ये त्यांची मोफत तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी आर्थिक सहकार्य केले.या शिबिरात शिवानी काटकर, अनिता नंदागवळी, शुभांगी मदनकर, वैशाली खंडाईत, भुमेश्वरी खंडाईत, प्रा. युवराज खोब्रागडे, विद्या भोयर, ललिता देशमुख, आरती धकाते, डॉ. एम.एम. कुंभारे, डॉ. राजश्री जनबंधू आदींनी किशोरींना विचारपूर्वक पाऊल उचलावी, असे मार्गदर्शन केले. यामध्ये १३० किशोरी, ४८ गरोदर माता, २३ स्तनदा माता, ७३ महिला व १५० विद्यार्थिनीची तपासणी करण्यात आली. संचालन प्रा. युवराज खोब्रागडे यांनी, तर आभार विद्या भोयर यांनी केले. यावेळी परिसरातील गावातील बहुसंख्य महिला व किशोरींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
किशोरींनी स्वच्छतेसोबत आहाराकडे लक्ष द्यावे
By admin | Updated: March 22, 2015 01:38 IST