शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या पेन्शनसाठी पुढाकार घेणार

By admin | Updated: January 20, 2015 22:33 IST

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त यातना सहन करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांनी धरणासाठी जमीन, घरे दिल्यामुळे त्यांच्याजवळ आता काही शिल्लक नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना पाच हजार रूपये महिना

पवनी : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त यातना सहन करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांनी धरणासाठी जमीन, घरे दिल्यामुळे त्यांच्याजवळ आता काही शिल्लक नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना पाच हजार रूपये महिना पेन्शन देण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे करणार आहे, असे प्रतिपादन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले. चिचखेडा पुनर्वसनस्थळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे, लक्ष्मीकांत तागडे, चिचखेडाच्या सरपंच कुंदा तलमले, पाथरीच्या सरपंच रिना भुरे, उपसरपंच शंकर महाजन, दादा आगरे, माजी सभापती माणिक गेडाम, वामन सेलोकर, झिबल गणवीर, लक्ष्मण ईखार, दादा रामटेके, वामन कुंभारे, यादोराव मेश्राम उपस्थित होते.यावेळी आ. अवसरे, विलास भोंगाडे, माणिक गेडाम, दादा आगरे यांचा प्रकल्पग्रस्तातर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विलास भोंगाडे म्हणाले, समितीच्या आंदोलनामुळे प्रकल्पग्रस्तांना अनेक लाभ मिळाले. १२०० कोटी रूपयाचे पुनर्वसन पॅकेज मिळाले तरीही प्रकल्पग्रस्तांना आता उपजिवीकेचे साधन उरले नसल्यामुळे राज्य व केंद्र शासनाच्या योजनेचे उपजिवीकेच्या पॅकेजची गरज आहे. यावेळी उपस्थित अतिथीनीही समयोचित मार्गदर्शन केले.प्रास्ताविक गुलाब मेश्राम, यांनी केले. संचालन कुनाल देशपांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी चंद्र रामटेके, दीपक तलमले, प्रदीप बांगडे, सुनिता बगडे, लता बगडे, ज्योती चव्हाण, तुरसाबाई तलमले, राकेश मेश्राम, प्रकाश देशपांडे, प्रिती मेश्राम यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)