शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आत्मविश्वासाच्या बळावर भरारी घ्या

By admin | Updated: March 22, 2015 01:36 IST

बचत गटाच्या व्यवसायामुळे महिलांच्या हातात पैसा आला. त्यामुळे कुटुंबाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.

भंडारा : बचत गटाच्या व्यवसायामुळे महिलांच्या हातात पैसा आला. त्यामुळे कुटुंबाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आता तिला घरातील निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जाते. महिलांनी इच्छाशक्ती व आत्मविश्वास कायम ठेवावा आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर आकाशात झेप घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.महिला आर्थिक विकास महामंडळ व महिला, बालविकास कार्यालयाच्या विद्यमाने शुक्रवारला आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी आर.बी. चलवदे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक संजय पाठक, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक अरविंद खापर्डे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, महिला व बाल कल्याण अधिकारी रवींद्र चव्हाण, माविमच्या जिल्हा समन्वयक ज्योती निंभोरकर उपस्थित होते.यावेळी डॉ. खोडे म्हणाल्या, महिला बचत गटांनी कोणतेही प्रॉडक्ट तयार करताना तो कच्चा माल म्हणून विकू नये तर त्याचे व्हॅल्यू अ‍ॅडिशन करून तो जास्त किमतीत विकावा. जसे तांदूळ महोत्सवामध्ये शेतकऱ्यांनी धानाऐवजी तांदूळ विकला. त्यामुळे त्यांना जास्त नफा मिळाला. असाच विचार महिला बचत गटांनी करावा. महिलांनी मुलगा व मुलीमध्ये फरक न करता त्यांना समानतेची वागणूक द्यावी तरच पुढची पिढी सुदृढ विचारांची होईल असे म्हटले.यावेळी कृषी अधिकारी आर.बी. चलवदे यांनी शेतकरी महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. बालविकास अधिकारी रवींद्र चव्हाण यांनी महिलांसाठी असलेले कायद्यांची माहिती दिली. महिलांनी कुणालाही न घाबरता त्यांच्या झालेल्या अत्याचाराची तक्रार करावी, असे सांगितले. संचालन देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन आंबेडारे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)