शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांना शासन सेवेत घ्या

By admin | Updated: September 20, 2015 01:01 IST

शासनानी ग्रामपंचायतीचे सर्व रेकॉर्ड, नोंदी, दाखले आॅनलाईन केले असल्याने भंडारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयात महाआॅनलाईन कडून संगणक परिचालकांची नेमणूक केली.

जांब (लोहारा) : शासनानी ग्रामपंचायतीचे सर्व रेकॉर्ड, नोंदी, दाखले आॅनलाईन केले असल्याने भंडारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयात महाआॅनलाईन कडून संगणक परिचालकांची नेमणूक केली. महाआॅनलाईनने नेमणूक केलेले संगणक परिचालक म्हणून कार्यत आहेत. त्यांनी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कामे नियुक्तीपासून आजपर्यंत व्यवस्थीत पार पाडत आहेत. संगणक परिचालकांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना सदर घेतलेला ठराव पाठविले आहे. महाआॅनलाईन नेमणूक केलेले संगणक परिचालकांच्या मानधन, वेतन करिता ग्रामपंचायतच्या १३ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून जिल्हा परिषद कडून महाआॅनलाईन निधी पुरविली जाते. सध्या सप्टेंबर महिन् यापासून तेराव्या वित्त आयोग बंद होत आहे. ग्रामपंचायतच्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायतचे पैसे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदर कंपनीला पाठविला जातो. पण ग्रामपंचायतकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एका संगणक परिचालकाकरिता जवळ जवळ एका महिन्याला दहा हजार रुपये पाठविला जातो. त्यानुसार संगणक परिचालकांचे ग्रामपंचायत मधील महत्व व आवश्यक लक्षात घेता संगणक परिचालकास जिल्हा परिषद कडून करावे अशा ठराव जिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायतीने बहुमताने घेऊन पास केला व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविले आहे. तरी राज्य शासनांनी ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालकांना शासन सेवेत समाविष्ट करण्याची मागणी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने केली आहे. पण प्रत्यक्ष संगणक परिचालकाला जिल्हा परिषदेकडून पाठविलेले पैसे पुरेपुर मिळत नसल्याचे लक्षात परिचालकांना शासकीय सेवेत का समाविष्ट करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)