शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

आंबेडकरी तत्त्वज्ञान आचरणात आणा

By admin | Updated: April 15, 2017 00:30 IST

भगवान गौतम बुध्दांचे आणि बाबासाहेबांचे पुतळे उभे केल्याने समाज परिवर्तन होत नसून बुध्द, आंबेडकरी तत्वज्ञान अंगीकारून आचरणात आणावे लागेल.

जोगेंद्र कवाडे : आमगाव येथे बुद्धविहाराचे लोकार्पणसाकोली : भगवान गौतम बुध्दांचे आणि बाबासाहेबांचे पुतळे उभे केल्याने समाज परिवर्तन होत नसून बुध्द, आंबेडकरी तत्वज्ञान अंगीकारून आचरणात आणावे लागेल. त्याशिवाय खऱ्या अर्थाने क्रांती होणार नाही. कधी नव्हे ती आता समाजाने एकत्रित होण्याची गरज असल्याचे आवाहन लाँग मार्चचे प्रणते प्रा.जोगेन्द्र कवाडे यांनी केले.सिध्दार्थ बौध्द विहार आमगाव (खुर्द) च्यावतीने तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती पुतळ््याचे अनावरण तथा बुध्द विहाराचे उद्घाटन लाँग मार्चचे प्रणते प्रा.जोगेन्द्र कवाडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पँथर हल्लाबोल ब्रिगेडचे अध्यक्ष परमानंद मेश्राम हे होते. योवळी धम्मशील गणवीर, एफ.एस. छतिसगडे, प्रा. अशोक घरडे, राकेश भलावी, पुरण लोणारे, अनमोल गजभिये, मदनपाल गोस्वामी, मंदा गणवीर, जिल्हा परिषद सदस्य, उषा डोंगरवार, पंचायत समिती सदस्य जगदिश नागदेवे, विलास मेश्राम, शिवा बघेल हे उपस्थित होते.यावेळी परमानंद मेश्राम म्हणाले, सरकार एकीकडे पुतळे, स्मारकांसाठी पुढाकार घेत आहे तर दुसरीकडे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान हस्तगत करण्याचे षडयंत्र करीत असून नाहीरे वर्गाच्या हक्कापासून त्यांना दूर करीत आहे. आपल्या अधिकारासाठी, क्रांतीची भाषा बोलतील त्यांना धार्मिक प्रकरणात अडकवा ते सर्व मुख्य मुद्यापासून भटकतील. व न्याय हक्काची लढाई विसरतील, असे आताची स्थिती बघून वाटत असल्याचे परमानंद मेश्राम म्हणाले, कार्यक्रमाला गावातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)मनोधैर्य पथक गठितभंडारा : मनोधैर्य योजनेचा लाभ मिळण्याकरिता अत्याचार बालकावरील लैंगिक अत्याचार, अ‍ॅसीड हल्ला प्रकरणातील पीडित व्यक्तीनी पोलिसांना तक्रारीनंतर मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचार यामध्ये पीडित महिला व बालकांना आधारासाठी व त्यांना मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी सहाय्य करण्याच्या हेतूने तालुकास्तरावर प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनोधैर्य टीम गठीत करण्यात आली. सदर मनोधैर्य टीममध्ये ग्रामीण क्षेत्रातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी संबंधित तालुका समन्वयक, पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, नर्स व तालुका समादेशक आहेत. (प्रतिनिधी)