शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय विभागातील लोकोपयोगी योजनांचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:53 IST

सामाजिक न्याय विभागाद्वारे विविध लोकोपयोगी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केल्या जाते. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा. त्याचाच एक भाग सिंदपूरी येथे शासकीय सर्व सोयीने युक्त अशी वास्तू निर्माण करण्यात आली, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह पवनी (सिंदपूरी/रुयाळ ) येथील वसतीगृह उद्घाटनप्रसंगी केले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : रुयाळ येथे वसतिगृह इमारतीचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सामाजिक न्याय विभागाद्वारे विविध लोकोपयोगी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केल्या जाते. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा. त्याचाच एक भाग सिंदपूरी येथे शासकीय सर्व सोयीने युक्त अशी वास्तू निर्माण करण्यात आली, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह पवनी (सिंदपूरी/रुयाळ ) येथील वसतीगृह उद्घाटनप्रसंगी केले.महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त निवडक अनुसूचित जाती व बौद्ध वस्त्यांचा सर्वांगिण विकास योजनेंतर्गत पवनी तालुक्यातील मौजा कन्हाळगाव येथील विविध विकास कामाचे, तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, पवनीकरीता नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या मौजा सिंदपुरी/रुयाळ येथील वसतीगृह इमारतीचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, पवनी पंचायत समितीचे सभापती धनराज ढेंगरे, जि.प. सदस्या मनोरथा जांभूळे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त आशा कवाडे, उपविभागीय अभियंता सावरकर, रुयाळचे सरपंच माधुरी पचारे, उपसरपंच भोगे, धारगावे, कन्हाळगावचे सरपंच माया बावनकुळे, उपसरपंच धरमदास मेश्राम, एकनाथ नागपूरकर, जि. प. माजी अध्यक्षा किसनाबाई भानारकर, पं.स. सदस्य मनोहर आकरे, प्रकाश गेडाम, परसराम डडमल व इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भूमीपूजन व उद्घाटन करण्यात आले.आमदार रामचंद्र अवसरे यांनी या क्षेत्रातील विकासाकरीता कटिबध्द असल्याचे मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ.सिध्दार्थ गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात विभागाद्वारे विविध योजना राबविल्या जातात, त्याची माहिती विषद केली. कार्यक्रमाचे संचालन बार्टीचे प्रकल्प अधिकारी बादल यांनी केले. आभार समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांनी मानले.सदर कार्यक्रमांप्रसंगी सिनेअभिनेता व प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांच्या ‘मी वादळ वारा’ या लोकगिताचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामवासी व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी समाजकल्याण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व कर्मचारी, बार्टीचे समता दूत, वसतीगहाचे गृहपाल व कर्मचारी, बीव्हीजी कंपनीचे कर्मचारी तसेच वसतीगृहाचे विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.