शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या रोजगाराभिमुख योजनांचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:16 IST

राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकराज्य मासिकात सविस्तर दिलेली असते. बंदीवान बांधवांनी कारागृहातून परत गेल्यानंतर लोकराज्यच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. विशेषत: रोजगार व स्वयंरोजगारासाठी शासनाने अतिशय उपयुक्त अशा योजना आखल्या असून या योजनांच्या माध्यमातून आपला आर्थिक व सामाजिक विकास साधला जाऊ शकतो. रोजगारभिमुख व उद्योगाभिमुख योजनांचा लाभ मोठया प्रमाणात घ्यावा, असे आवाहन कारागृह अधिक्षक अनुपकुमार कुमरे यांनी केले.

ठळक मुद्देअनुप कुमरे : जिल्हा कारागृहात वाचक अभियानांतर्गत रोजगार व स्वयंरोजगारावर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकराज्य मासिकात सविस्तर दिलेली असते. बंदीवान बांधवांनी कारागृहातून परत गेल्यानंतर लोकराज्यच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. विशेषत: रोजगार व स्वयंरोजगारासाठी शासनाने अतिशय उपयुक्त अशा योजना आखल्या असून या योजनांच्या माध्यमातून आपला आर्थिक व सामाजिक विकास साधला जाऊ शकतो. रोजगारभिमुख व उद्योगाभिमुख योजनांचा लाभ मोठया प्रमाणात घ्यावा, असे आवाहन कारागृह अधिक्षक अनुपकुमार कुमरे यांनी केले.जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकराज्य वाचक अभियानांतर्गत भंडारा कारागृहात बंदीवान बांधवांसाठी लोकराज्य मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, पत्रकार ज्ञानेश्वर मुंदे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी अमृत आगाशे, तुरुंग अधिकारी रमेश मेंगळे व तुरुंग अधिकारी संतोष क्षीरसागर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात लोकराज्यच्या सामर्थ शिक्षणाचे, समृध्द महाराष्ट्राचे या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.राज्य शासनाने कौशल्यविकासावर भर दिला असून कौशल्यावर आधारित विविध योजना शासन राबवित आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास, प्रधानमंत्री मुद्रा योजना, शेतीपूरक कौशल्य प्रशिक्षण, पशुसंवर्धन दुग्धविकास, छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्यविकास, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, अणासाहेब पाटील व्याज परतावा योजना अशा अनेक योजना सामान्य माणसासाठी शासन राबवित आहे. या सर्व योजनांची माहिती शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्यमध्ये देण्यात आली आहे. बंदीवान बांधवांनी या योजनांचा लाभ घेवून आपले जीवन समृध्द करावे, असे अनुप कुमरे म्हणाले.आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, शेतीपूरक व्यवसाय यासह शासनाच्या इतर योजनांचा लाभ तसेच लघुउद्योग करण्यासाठी सुलभ कर्ज घेवून आपली आर्थिक उन्नती करावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी केले. शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकराज्य मासिकात नियमितपणे दिली जाते. शासकीय वाचनालयात लोकराज्य मासिक उपलब्ध असून या माध्यमातून योजनांची माहिती घेवून संबंधित कार्यालयाशी संपर्क साधल्यास योजनांचा लाभ घेणे सोईचे होईल, असे त्यांनी सांगितले.यासोबतच आरोग्य शिबीर, आरोग्य तपासणी, मनोरंजन, स्वच्छता अभियान तसेच समुपदेशन आदी सारखे कार्यक्रम नियमित घेण्यात येतात, अशी माहिती तुरंग अधिकारी रमेश मेंगळे यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन रमेश मेंगळे यांनी केले. या कार्यक्रमास तुरुंगातील अधिकारी, कर्मचारी व बंदीवान बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.