शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

दोषी पोलिसांवर कारवाई करा

By admin | Updated: March 15, 2017 00:20 IST

लाखांदूर येथे १६ वर्षीय मुलीवरील सामूहिक अत्याचाराची चित्रफित तयार करून सोशल मिडीयावर व्हायरल...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अखिल भारतीय माळी महासघांची मागणीभंडारा : लाखांदूर येथे १६ वर्षीय मुलीवरील सामूहिक अत्याचाराची चित्रफित तयार करून सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी दोषींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाने जिल्हाधिकारी अभिजीत डॉ.चौधरी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकरणावर लाखांदूर येथे पोलीस कर्मचाऱ्यांनी दोषींना पाठिशी घालण्यासाठीच कारवाई टाळली. अशा पोलिसांना शिक्षा ठोठावली जावी, अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाचे विदर्भ प्रांताध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनात, पीडित मुलगी ही अत्यंत गरीब घरची आहे. दहाव्या वर्गात शिकून व मोलमजुरी करुन कुटुंबाला आर्थिक हातभार लावणाऱ्या या पीडित मुलीला पाच तरुणाने जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार केला. २५ फेब्रुवारीच्या हे प्रकरण या तरुणांनी मोबाईलवर चित्रफित तयार करुन ती सोशल मिडीयावर पसरविली. याची माहिती लाखांदूर येथील पोलीस निरीक्षकांसह पोलीस विभागाच्या सर्व यंत्रणेला असतांनाही त्यांनी कारवाई करण्याऐवजी आरोपींना पाठीशी घालण्याचा किळसवाणव प्रकार केला आहे. आरोपींना पाठीशी घालण्यामागे पोलीस विभागातील हेमंत चांदेवार या पोलीस निरीक्षकाचाही सहभाग असल्याचा आरोप या निवेदनातून केला आहे. दरम्यानच्या काळात पीडिता व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची व घर पेटवून देण्याची धमकी दिल्याचीही बाब आता समोर आली आहे. अशा गंभीर प्रकरणात तत्कालीन ठाणेदार व त्यांच्या अधिनस्थ गुप्तचर यंत्रणेचाही दोष असल्याने प्रकरण दडपण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे उघड होते. त्यामुळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून केली आहे. याची प्रतिलिपी मुख्यमंत्री, मानवधिकार आयोग, महिला आयोग यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जि.प. सदस्य रेखा भुसारी, कैलास जामगडे, बी. एन. मदनकर, प्रकाश अटाळकर, बंडू बनकर, अनिल किरणापुरे, अ‍ॅड. रवि भुसारी, उमेश महाडोळे, नितेश किरणापुरे, मनोज बोरकर, यशवंत उपरीकर, माधवी देशकर, विजय शहारे, वृंदा गायधने, शंकर राऊत, बी. जी. किरणापुरे, ए. डी. बनकर आंदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)महासंघाने या मागण्या केल्या आहेतकर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, न्यायालयासमोर पीडित मुलगी व तिच्या आई-वडिलांचे बयाण नोंदवावे, आरोपींच्या कुटुंबीयांकडून पीडिता व तिच्या कुटुंबाला धोका असल्याने पोलीस संरक्षण द्यावे, ज्या मोबाईलधारकांकडे चित्रफित असेल अशांवर सायबर क्राईमअंतर्गत गुन्हा नोंदवावा, खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा, घटनेचा संपूर्ण तपास सक्षम अधिकाऱ्यामार्फत करावा व सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.