शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पाच आरोपींवर कठोर कारवाई करा!

By admin | Updated: March 16, 2017 00:27 IST

लाखांदूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मूलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांची तात्काळ चौकशी करुन

तहसीलदारांना निवेदन : १७ मार्चला सर्वपक्षीय मोर्चातुमसर : लाखांदूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मूलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांची तात्काळ चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून १७ मार्चला महासंघातर्फे सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, लाखांदूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. यात पाच नराधमांचा समावेश असून त्यांनी अत्याचाराची चित्रफीत तयार केली. ही चित्रफीत सोशल मिडीयावर व्हायरल केली.इयत्ता १० व्या वर्गात शिकणारी पीडित मुलगी शाळेतून घरी परततांना ही संतापजकन प्रकार घडला. शेतावर मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील ही मुलगी असून मागील अनेक दिवसापासून तिच्यावर पाळत ठेवण्यात येत होती. वाटेत अडवून तोंडात बोळा घालून व डोळ्यावर पट्टी बांधून नराधमांनी गावापासून १० किमी अंतरावर दुचाकीने तिला नेण्यात आले. अत्याचार केल्यावर घरी कुणाला सांगितल्यास आई-वडील व बहिनीला जीवे मारण्याची व घर पेटविण्याची धमकी देण्यात आली. पीडित मुलीने भितीपोटी हा झालेला प्रकार लपवून ठेवला. नराधमांनी चित्रफीत व्हायरल केल्यावर खरे सत्य उघडकीस आले. पोलीस प्रशासनाने हा सर्व प्रकार केवळ बघ्याच्या भूमिकेत पाहिला. हे संतापजनक आहे.तुमसरचे तहसीलदार डी. टी. सोनवाने यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. शिष्टमंडळात तुमसर पंचायत समितीच्या सभापती कविता बनकर, जि.प. सदस्य संदीप ताले, गटनेता हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य मुन्ना पुंडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बंडू बनकर सह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)माळी महासंघ तथा सर्वपक्षीय मोर्च्याचे आयोजन १७ मार्च रोजी करण्यात आले आहे. पाचही नराधमांना कठोर शिक्षा व कारवाई न केल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल.- कविता बनकर, सभापती पं.स. तुमसर