शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

युवकाच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

राज्यात अनुसूचित जाती - जमाती अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून नागपूरसह पुणे जिल्ह्यातील विराज जगताप याचा एका प्रेम प्रकरणावरून जातीयवाद्यांनी हल्ला केला. यासोबतच जळगाव, परभणी जिल्ह्यातील पाच तरुणांवर हल्ला झाला. तर अहमदनगर जिल्ह्यातील राहुल अडसूळ यांच्यावर गावातील लोकांनी मिळून हल्ला केला होता. जालना जिल्ह्यात एका परिवाराला टोळीने मारहाण केली होती.

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीची मागणी : तहसीलदारांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : नागपूर जिल्ह्यातील अरविंद बन्सोड या युवकाची भर रस्त्यात हत्या करण्यात आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीतांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली असून लाखनीचे तहसीलदार मल्लीक विराणी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.राज्यात अनुसूचित जाती - जमाती अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून नागपूरसह पुणे जिल्ह्यातील विराज जगताप याचा एका प्रेम प्रकरणावरून जातीयवाद्यांनी हल्ला केला. यासोबतच जळगाव, परभणी जिल्ह्यातील पाच तरुणांवर हल्ला झाला. तर अहमदनगर जिल्ह्यातील राहुल अडसूळ यांच्यावर गावातील लोकांनी मिळून हल्ला केला होता. जालना जिल्ह्यात एका परिवाराला टोळीने मारहाण केली होती. जालना जिल्ह्यातील मनठा येथील शिक्षकाला जातीयवादी शिवीगाळ करून आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची घटना घडली होती. परभणी जिल्ह्यातील निळा गावातील महिला सरपंचांना कोरोना काळात क्वारंटाईन केले म्हणून मारहाण केल्याची घटना घडली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील आंतरजातीय प्रेमप्रकरणातून कुटुंबाची हत्या करण्यात आली होती. तसेच बीड जिल्ह्यातही समाजातील काही बांधवांनी हल्ला केला होता. अशा राज्यात विविध ठिकाणी अनेक घटना घडल्या असल्याने वाढत्या घटनांना रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक दीपक जनबंधू, नेहाल कांबळे, मंगेश गेडाम, ओंकार कोवे, पवन गजभिये, अतुल नागदेवे, केशव रामटेके, प्रांजल लांडगे, अलबक्ष खान, सचिन रामटेके आदी उपस्थित होते.लाखांदूरात भारिप बहुजन महासंघाचे निवेदनलाखांदूर : भारिप बहुजन महासंघ लाखांदूर तालुका शाखेच्या वतीने अरविंद बन्सोड व विराट जगताप यांच्या खटल्याप्रकरणी सखोल चौकशी करून स्वतंत्र पोलीस निरीक्षकांच्या नेमणुकीसाठी लाखांदूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. राज्यात काही जिल्ह्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. अरविंद बन्सोड व विराट जपताप हे दोन युवक या अत्याचाराचे बळी ठरले आहेत. यासाठी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती करून जिल्हास्तरावर स्वतंत्र पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी भारिप बहुजन महासंघ लाखांदूरच्या वतीने तहसीलदार संतोष महल्ले यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष युवराज सुखदेवे, उपाध्यक्ष स्वप्नील बन्सोड, आनंदराव लोखंडे, प्रकाश सुखदेवे, गुलजारीलाल बन्सोड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Murderखून