शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

अन् पहाटेपर्यंत तहसीलदाराने धान्य वाटले...!

By admin | Updated: April 18, 2016 00:27 IST

देव्हाडा खूर्द येथे शिधापत्रिका जोडण्यावरुन वाद शिगेला पोहोचला आहे.

यांना नोटीस कोण देणार? : तहसीलदारांना घेराव करणारराजू बांते  मोहाडी देव्हाडा खूर्द येथे शिधापत्रिका जोडण्यावरुन वाद शिगेला पोहोचला आहे. तीन महिन्यापासून देव्हाडा येथील अंत्योदय, बीपीएल शिधापत्रिकाधारकांनी धान्यांची उचल केली नाही. काही शिधापत्रिकाधारक तहसीलवर येथून धडकले. अखेर तहसीलदार नमले. त्यांनी आपला ताफा देव्हाडा खुर्द येथे नेवून उशिरा रात्रीपर्यंत शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केल्याची बाब समोर आली आहे.देव्हाडा खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानदार डी.बी. मुटकुरे यांच्या दुकानातील अर्ध्याअधिक शिधापत्रिका नवेगाव येथील प्रभाकर मोहतुरे यांच्या स्वस्त धान्य दुकानाला जोडण्यात आल्या आहेत. या शिधापत्रिकेत बीपीएल, अत्योंदय कार्डधारकांचा अधिक भरणा आहे. गावकरी व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात गेल्या सहा वर्षापासून वादावादी सुरु आहे. पण, देव्हाडा येथील स्वस्त धान्य दुकानदार ज्ञानेश्वर मुटकुरे न्याय/ अन्याय यांच्या दुष्टचक्रात प्रशासनाच्या चुकीमुळे होरपळत आहेत. स्वस्त धान्य दुकानदार ज्ञानेश्वर मुटकुरे यांच्या दुकानात धान्य फेब्रुवारी २०१६ पासून पडून आहे. पण नवेगाव येथे जोडलेल्या कार्डधारकांनी धान्यादी गावातून उचल केली नाही. बुधवार १३ एप्रिल रोजी काही शंभरक शिधापत्रिका धारक तहसिलदारांच्या दालनात येवून धडकले. आम्हाला धान्य हवे आहेत आजच धान्याचे वाटप झाले पाहिजे असा आग्रह करीत होते.दालनात तहसिलदाराला सुमारे दोन तास घेराव करण्यात आला. शेवटी विशेष बाब म्हणून तहसीलदार धनंजय देशमुख यांनी तुमच्या गावात येवून शिधा वाटप करण्याचे आश्वासन शिधापत्रिका धारकांना दिले.देव्हाडा/ खुर्द येथे तहसिलदार धनंजय दशेमुख, परिवेक्षीय तहसीलदार नरेंद्र देशमुख, कनिष्ठ सहायक रामनारायण धकाते, कनिष्ठ लिपीक अंकुश कावरे, कोतवाल हेमंत गराडे यांचा ताफा पोहचला. देव्हाडा येथील स्वस्त धान्य दुकानदार ज्ञानेश्वर मुटकेरे घरी नसतांना धान्यांचा पंचनामा केला. संबंधित शिधापत्रिकाधारकांचा वाट्याला येणारे धान्य गावच्या हनुमान मंदिरात नेण्यात आले. सायंकाळी ४.३० वाजतापासून धान्याचे वाटप सुरु झाले. रात्रीच्या २.३० पर्यंत धान्याचे वाटप चालत राहिले. उशिरा रात्रीपर्यंत तहसिलदार यांनी ठाण मांडून धान्याचे वाटप करुन घेतले.दुसरीकडे नवेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार प्रभाकर मोहतुरे देव्हाडा येथील शिधापत्रिका माझ्या दुकानाला जोडू नका असे पत्र देत आहे. मला गावाच्या भानगडीत पडायचे नाही अशी विनवणी प्रशासनाला करीत आहेत. पण, प्रशासन सदर दुकानदारावर दबाव तंत्राचा वापर करीत आहेत. तहसीलदारांनी त्यांना धान्य जोडण्याचे दोनदा आदेश काढले आहे. दुसरी बाब आणखी एक प्रकाशात आली, देव्हाडा खू. येथील धान्य दुकानदार ज्ञानेवर मुटकुरे रात्री धान्याचे वाटप करतात अशी तक्रार जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसिलदार यांच्याकडे करण्यात आली. न्यायाची प्रतीक्षास्वस्त धान्य दुकानदार संघटना मोहाडीच्यावतीने १८ एप्रिल रोजी तहसिलदार मोहाडी यांना घेराव करणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष अरविंद कारेमोरे यांनी सांगितले. तसेच आमदार चरण वाघमारे यांना निवेदनदेवून दिला जाणार आहे. प्रशासनाचा जाहिर निषेध करण्यात येणार आहे.तहसीलदार धनंजय देशमुख बुधवारपर्यंत सुटीवर गेले आहेत. त्यांना देव्हाडा प्रकरणात विचारणा करण्यासाठी भ्रमणध्वनीवर सदर प्रतिनिधीने संपर्क केला. पण, भ्रमणध्वनीवर बाबा घरी नाहीत असे उत्तर त्यांची मुलगी देत आहे.