शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
3
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
5
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
6
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
7
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
8
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
9
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
10
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
11
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
12
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
13
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
14
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
15
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
16
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
18
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
19
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
20
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती

हॉटेल्समधील ‘तडका’ त्रासदायक

By admin | Updated: June 20, 2016 00:28 IST

वाहन चालविताना अचानक डोळ्यात तिखट गेल्याचा अनुभव अनेकांना येतो.

अनुभव : वाहनचालकांच्या डोळ्यांवर होतोय परिणाम पवनी : वाहन चालविताना अचानक डोळ्यात तिखट गेल्याचा अनुभव अनेकांना येतो. मग, लगेच वाहन थांबवून डोळे चोळण्याशिवाय काही पर्याय नसतो. हे तिखट डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. हे तिखट त्याच मार्गावरील हॉटेलमधील असू शकते, अशा हॉटेलांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनाची आहे. याबाबत त्यांनी अनेकदा हॉटेल चालकांना सूचना दिल्या आहेत. मात्र, आजही शहरातील विविध मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना हा अनुभव येत आहेत. शहरातील वाढती वाहनाची संख्या प्रदूषणात भर टाकत आहे. हे प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरणारे आहे. यापासून दूर जाण्याचा प्रयत्न प्रत्येक वाहनचालक करतात. मात्र, आता हॉटेलमधील तिखटाचा तडका नागरिकांसाठी घातक ठरत आहे. भरधाव वेगाने जाणारी वाहने अचानक ब्रेक दाबून थांबवावी लागतात. चालकाला डोळे चोळत काही वेळ वाट पहावी लागते. समोरचे स्पष्ट दिसू लागल्यानंतरच तो पुढे जाऊ शकतो. या प्रकाराचा अनुभव सायंकाळी वाहनचालक घेत आहेत. शहरातील विविध मार्गांवर हॉटेल्स, चायनिज सेंटर्सवर खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. तिखटाचा वापर होतो. खाद्यपदार्थांची विक्री करताना अन्न व औषधी प्रशासनाच्या नियमावलीचे पालन करणे आवश्यक असते. अन्न पदार्थ बनविताना उडणारे तेल व तिखटांचे बारीक कण उंचावर चिमणी लावून सोडण्याचा नियम आहे. (तालुका प्रतिनिधी)