लाखनी : स्वाईन फ्लू आजाराने ग्रस्त एक महिला आढळून आली आहे. तिची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी केल्यानंतर तिला स्वाईन फ्ल्यू असल्याचे उघडकीस आले आहे. सदर महिला नातेवाईकांकडे अजमेर येथे गेल्या होत्या. घशात दुखणे, श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्या महिलेने खासगी दवाखान्यात धाव घेतली होती. परिसरात रुग्ण आढळून आल्याने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा अंतर्गत ६० घरांचे स्वाईन फ्लू सर्वेक्षण करण्यात आले. तपासणी करण्यात आली. स्वाईन फ्ल्यू जनजागृतीबाबत स्थानिक पंचायत समिती सभागृहात अंगणवाडी, आशा कार्यकर्त्यांची सभा आयोजित करुन त्यांना दिशानिर्देश देण्यात आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
लाखनीत स्वाईन फ्लूचा संशयित रुग्ण
By admin | Updated: March 1, 2015 00:32 IST