शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्ल्यूू जनजागृती अभियान

By admin | Updated: November 22, 2015 00:30 IST

येथील समर्थ महाविद्यालयाच्या एनसीसी पथकातर्फे लेफ्टनंट प्रा. बाळकृष्ण रामटेके यांच्या नेतृत्वात एनसीसी कॅडेट्सनी स्वाईन फ्लू जनजागृती अभियान राबविण्यात आले.

लाखनी : येथील समर्थ महाविद्यालयाच्या एनसीसी पथकातर्फे लेफ्टनंट प्रा. बाळकृष्ण रामटेके यांच्या नेतृत्वात एनसीसी कॅडेट्सनी स्वाईन फ्लू जनजागृती अभियान राबविण्यात आले. लाखनी येथे आठवडी बाजाराच्या दिवशी फलक आणि हस्तपत्रकांचा वापर करीत सर्वसामान्य जनतेमध्ये स्वाईन फ्लू या गंभीर आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. आठवडी बाजारातील दुकानदारांना भाजीपाले, विक्रेते मिठाई विक्रेत्यांना स्वाईन फ्लू या आजाराविषयी सावध राहण्याचे आवाहन एनसीसी पथकाने केले. या जनजागृती अभियानात ५२ एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते.एच-वन, एच-वन या विषाणूंमुळे होणारा स्वाईन फ्लू संसर्गजन्य आजार आहे. या आजाराने जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तुमसर तालुक्यात संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून स्वच्छता धुळ फवारणी करण्यात येत आहे. खोकलताना तोंडावर रूमाल ठेवावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे, सर्दी, खोकला, ताप आल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. जिल्हा रुग्णालयात या आजारावरील औषधोपचार नि:शुल्क असून आजाराची लक्षणे आढळून आल्यास रुग्णालयात त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, आजारी व्यक्तीपासून दूर राहा. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, दररोज फळे, भाजीपाला आहार घ्यावा. शांत झोप घ्यावी, स्वाईन फ्लू प्रसार ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी यात्रा करण्याचे टाळावे. डुकरांपासून या आजारांचे विषाणू पसरत असल्याने डुक्कर मालकांनी नागरी वसाहतीमध्ये असलेल्या डुकरांना शहराबाहेर काढण्याच्या सुचना पालिका प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. या अभियानाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांचे मार्गदर्शन लाभले. या अभियानाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अभियानाकरिता उपप्राचार्य डॉ. राम आर्वीकर, प्रा. गिरीपुंजे, डॉ. भोवते, प्रा. मेश्राम, डॉ. कापसे, एनसीसी माजी कॅडेट्स सचिव पडोळे यांनी सक्रीय सहभाग घेतला. (तालुका प्रतिनिधी)