शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 05:00 IST

आता नामांकनासाठी शनिवार आणि सोमवार असे दोनच दिवस शिल्लक असल्याने या दोन दिवसांत सर्व राजकीय पक्षांना उमेदवाराची घोषणा करावी लागणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक होत आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही नामांकन दाखल झाले नव्हते.  दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी चार, तर पंचायत समितीसाठी तीन नामांकने दाखल झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नामांकन दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशीही कोणत्याच राजकीय पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. त्यामुळे उमेदवारीचा सस्पेन्स कायम असून कुणाला तिकीट मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरांची भीती असल्याने उमेदवारांची यादी घोषित होण्यास विलंब होत आहे. आता नामांकनासाठी शनिवार आणि सोमवार असे दोनच दिवस शिल्लक असल्याने या दोन दिवसांत सर्व राजकीय पक्षांना उमेदवाराची घोषणा करावी लागणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक होत आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही नामांकन दाखल झाले नव्हते.  दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी चार, तर पंचायत समितीसाठी तीन नामांकने दाखल झाली. तीन दिवस झाले तरी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. जवळपास सर्वच पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी तयार केली आहे. मात्र बंडखोरी होण्याची भीती असल्याने सर्वांनीच सस्पेन्स कायम ठेवला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपने अद्यापही आपल्या अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. आता केवळ दोन दिवस उमेदवारी दाखल करण्यासाठी आहेत. शनिवार आणि सोमवार असे ते दोन दिवस असून, रविवारी सुट्टी असल्याने नामांकन दाखल करता येणार नाही. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत नामांकन दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर आणि मोहाडी नगरपंचायतीची निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठीही अद्याप कोणत्याच पक्षाने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. मात्र ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

महिला उमेदवारासाठी खरी दमछाक

- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महिलांसाठी राखीव असलेल्या गण आणि गटांत उमेदवार मिळविताना मोठी दमछाक होत असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी त्या परिसरातील राजकीय पदाधिकारी असलेल्या व्यक्तींच्या पत्नींना तिकीट देण्याचा प्रयत्न चालविला आहे. राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेल्या या महिलांना तिकीट दिली जाणार आहे. त्यामुळे पुढील सर्व कारभार त्यांचे पतिराजच चालविणार आहेत. जिल्ह्यात सक्षम महिला नेतृत्व असले तरी त्यांना या निवडणुकीत तिकीट देण्याऐवजी पदाधिकाऱ्यांच्या घरच्या मंडळींनाच तिकीट देण्यावर भर आहे. जिल्हा परिषदेसाठी एकवेळ महिला उमेदवार मिळतीलही मात्र पंचायत समितीसाठी महिला उमेदवार मिळविण्याची मोठी कसरत राजकीय पक्षांना करावी लागत आहे. काहीही झाले तर सर्वच पक्षांना सर्व ठिकाणी उमेदवार द्यावे लागणार आहे. त्यासाठी जुळवाजुळव सुरू आहे.

तिसऱ्या दिवशी ४७ उमेदवारांचे नामांकन- जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीसाठी तिसऱ्या दिवशी ४७ नामांकन दाखल करण्यात आले. जिल्हा परिषदेसाठी २१ तर पंचायत समितीसाठी २४ आणि नगरपंचायतीसाठी दोन नामांकन दाखल करण्यात आले. तुमसर येथे गटासाठी नऊ तर गणासाठी १२, भंडारा गटासाठी नऊ तर गणासाठी ११ आणि लाखांदूर येथे गटासाठी तीन नामांकन दाखल झाले आहे. तर लाखनी आणि मोहाडी नगरपंचायतीसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद