शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

निलंबित करा; अन्यथा घेराव

By admin | Updated: September 18, 2016 00:34 IST

भंडारा वनविभागांतर्गत येथील अधिकाऱ्यांनी संगनमत करून परवानगीविना वृक्षांची कटाई केली.

प्रकरण वनविभागातील वृक्षकटाईचे : वनमंत्र्यांना दिले निवेदन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशाराभंडारा : भंडारा वनविभागांतर्गत येथील अधिकाऱ्यांनी संगनमत करून परवानगीविना वृक्षांची कटाई केली. याप्रकरणात अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार समोर येत आहे. याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा घेराव घालण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी दिला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सदर निवेदन पाठविले आहे. या निवेदनात त्यांनी भंडारा उपवन संरक्षक कार्यालयातील वृक्षांची विनापरवानगी कटाई केल्याचे गंभीर प्रकरण असून यात दोषी अधिकाऱ्याला पाठीशी घालीत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. उपवनसंरक्षण कार्यालय व वनपरिक्षेत्र कार्यालयात असलेल्या वृक्षांची नगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिलेली नाही. असे असतानाही अधिकाऱ्यानी पदाचा दुरूपयोग करून ८० सागवान वृक्ष व १२९ आडजात वृक्षांची तोड केल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सदर अधिकाऱ्यांनी लाखो रूपयांची विल्लेवाट लावल्याचाही संशय विजय शहारे यांनी व्यक्त केला आहे. भंडारा येथील वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांच्या वर्षभराच्या कारकिर्दीत अनेक गंभीर प्रकरणे घडल्याचाही संशय व्यक्त होत आहे. वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च वनविभाग करीत असताना येथील वृक्षांची सर्रासपणे तोड करण्यात आली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणात प्रथमदर्शनी वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम हे दोषी आढळून येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची उपवनसंरक्षक कार्यालयाने गंभीर दखल घेवून चौकशी करणे गरजेचे आहे. मात्र एवढ्या दिवसाचा कालावधी लोटलानंतरही सदर विभागाने कुठलीही दखल घेतलेली दिसून येत नाही. यासोबतच कोका विश्रामगृहाचे लाकूड साहित्यही मेश्राम यांनी स्वत:च्या शासकीय वसाहतीत ठेवून त्या साहित्यांची परस्पर विल्हेवाट लावल्याचा घाट घातला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. शुल्लकशा कारणावरून दोन वनकर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. सागवान वृक्ष कटाई व लाकूड साहित्यांची विल्हेवाट लावण्याचे गंभीर प्रकरण समोर आले असतानाही दोषी अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. वनविभागाने आठवडाभरात या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई न केल्यास मनसे स्टाईल घेराव आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष शहारे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य वनसंरक्षक नागपूर, उपवनसंरक्षक भंडारा यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)लोकमतच्या वृत्ताची मनसेकडून दखलभंडारा वनविभागांतर्गत सागवन वृक्ष कटाई व लाकूड साहित्यांची अफरातफर प्रकरणाची वृत्तमालिका 'लोकमत'मध्ये प्रकाशित होत आहे. याची दखल यापूर्वी महाराष्ट्र वनपाल व वनरक्षक संघटनेने घेवून याची चौकशी करण्याची मागणी केली होती. आता या गंभीर प्रकरणाची दखल मनसेने घेतली असून लोकमतमध्ये प्रकाशित होत असलेल्या वृत्तमालेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली असल्याने वनविभाग काय भूमिका घेते याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.वनसंवर्धनाची जबाबदारी असलेल्या वनाधिकाऱ्यांनी नियम पायदळी तुडविल्याचा प्रकार आहे. दोषींना निलंबना ऐवजी पाठिशी घालीत असल्यास खपवून घेणार नाही.-विजय शहारे,जिल्हाध्यक्ष, मनसे.