शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

खंडविकास अधिकाऱ्यांना निलंबित करा

By admin | Updated: May 11, 2016 00:51 IST

येरली येथील सीमेंट रस्ता बांधकामात अनियमितता प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून तांत्रिक अधिकाऱ्याची नियुक्ती न करता ...

येरली येथील सिमेंट रस्ता प्रकरण : तांत्रिक अधिकाऱ्याऐवजी विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्तीतुमसर : येरली येथील सीमेंट रस्ता बांधकामात अनियमितता प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून तांत्रिक अधिकाऱ्याची नियुक्ती न करता विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती खंडविकास अधिकाऱ्यांनी केली. मागील चार महिन्यांपासून चौकशीचा अहवाल सादर करण्यास टाळाटाळ केली जात आहे. सदर प्रकरणात हयगय केल्याप्रकरणी खंडविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी पंचायत समिती सदस्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.येरली येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आनंदराव रहांगडाले ते सूरजलाल पारधी यांच्या घरापर्यंत सीमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले. ६० मिटर पैकी ४२ मिटर बांधकाम करण्यात आले. १८ मिटर रस्ता बांधकाम केला नाही. कामाचा कालावधी १८ मार्च २०१४ ते २३ एप्रिल २०१४ असा होता. दि. २४ एप्रिल २०१४ ला काम पूर्ण झाल्याची नोंद पुस्तिकेत आहे. परंतु प्रस्तावित जागेवर केवळ ४२ मीटर रस्ता बांधकाम करण्यात आले. १८ मिटर रस्ता प्रस्तावित जागेवर नाही.या रस्ता बांधकामाची अंदाजपत्रकीय किंमत २०२१०० खर्च झालेली रक्कम १९७७६४ आहे. येथे अंतिम देयकाची उचल करण्यात आली. सदर रस्त्याची ग्रामस्थांनी तक्रार केल्यावर खंडविकास अधिकाऱ्यांनी चौकशीकरिता तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती न करता विस्तार अधिकारी राजूरकर यांची नियुक्ती केली. चार महिन्यापासून चौकशीचा अहवाल अजूनपर्यंत आला नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. कर्तव्यात कसूर व दप्तरदिरंगाई प्रकरणी संबंधित खंडविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य मुन्ना पुंडे यांनी केली तथा येरली येथील सिमेंट रस्ता प्रकरणी जिल्हास्तरीय तांत्रिक अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याची मागणीही मुन्ना पुंडे यांनी केली. (तालुका प्रतिनिधी) दोन्ही माजी आमदारांनी राजकारण करू नयेतुमसर तालुक्यात सिंचन प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, परंतु त्यांना शेतीचा मोबदला अजूनपर्यंत मिळाला नाही. आ.चरण वाघमारे यांनी शासनाकडून मुबलक निधी आणून सरळ खरेदी प्रक्रियेतून जमिनीचा मोबदला मिळवून दिला. लाभ क्षेत्रातील ५०० एकर जमिनीवर सुक्ष्मसिंचन योजना लवकरच कार्यान्वित होत आहे. माजी आ.अनिल बावनकर व माजी आ.मधुकर कुकडे यांनी राजकारण करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांचे हित समजले असते तर शेतकऱ्यांकरिता भरीव मदत त्यांच्या कार्यकाळात केली असती. बघेडा, कारली, सोरणा, आंबागड, नागठाणा जलाशयात बावनथडीचे पाणी आ.वाघमारे यांच्या प्रयत्नामुळेच झाले. बावनथडी प्रकल्पातून त्यांच्या कार्यकाळात केवळ पाच हजार हेक्टर जमिनीला पाणी मिळाले तर सध्या ११ हजार हेक्टर शेतीला पाणी सोडण्यात आले. विद्यमान आमदारावर आरोप करणाऱ्या माजी आमदारांनी पुरावे सादर करून बोलावे. असे भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पटले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला माजी पं.स. सभापती कलाम शेख, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अमर टेंभरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बंडू बनकर उपस्थित होते.