शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सहायक कामगार आयुक्तांना निलंबित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:01 IST

जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत झालेल्या नोंदीत बांधकाम कामगारांचे सहा वर्षातील लाभाचे हजारोच्या संख्येने प्रकरणे प्रलंबित आहे. याला सहायक कामगार आयुक्त भंडारा कारणीभूत आहे.

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेसची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत झालेल्या नोंदीत बांधकाम कामगारांचे सहा वर्षातील लाभाचे हजारोच्या संख्येने प्रकरणे प्रलंबित आहे. याला सहायक कामगार आयुक्त भंडारा कारणीभूत आहे.त्यामुळे अकार्यक्षम सहायक कामगार आयुक्तांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. सन २०१२ ते आजपर्यंत भंडारा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे हजारोच्या संख्येने प्रकरणे प्रलंबित आहेत.त्यामुळे कामगारांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे. याला कारणीभूत सहायक कामगार आयुक्त आहेत. ६ आॅगस्ट २०१८ रोजी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये ३१ आॅगस्टपर्यंत संपूर्ण प्रलंबित प्रकरण निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.परंतु सहायक कामगार आयुक्तांनी त्या परिपत्रकाची अंमलबजावणी न करता त्या निर्देशाची अवमानना केली आहे. परिणामी हजारो कामगारावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. सन २०१२ ते आजपर्यंतच्या लाभाचे प्रकरण त्वरीत निकाली काढण्यात यावे. सहायक कामगार आयुक्ताच्या अकार्यक्षम प्रणालीची चौकशी करून त्यांना त्वरीत निलंबित करण्यात यावे, भंडारा जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर कामगार मंडळाची कार्यलय स्थापित करून कामगारांना सुविधा देण्यात यावे, अशी मागणी आहे. सदर मागण्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा आंदोलनाचा इशारा दिलेल्या निवेदनातून दिला आहे.शिष्टमंडळात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा काँग्रेस असंघटीत कामगार संघटनेचे अध्यक्ष मार्कंड भेंडारकर, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, बांधकाम सभापती प्रेम वनवे, महिला व बाल कल्याण सभापती रेखा वासनिक, अनिक जमा पटेल, सुभाष आजबले, अशोक कापगते, अजय गडकरी, दिलीप कुंभारे, प्रशांत देशकर, कमलाकर निखाडे, लालू कटरे, मंगेश हुमणे, डॉ. विनोद भोयर, गणेश निमजे, जीवन भजनकर, किशोर हरडे, धनराज साठवणे, संजय वाघमारे आदींचा सहभाग होता.