शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

साहायक अभियंत्याचे कंत्राटदाराला पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:44 IST

तालुक्यातील रोहणा येथे जिल्हा परिषदच्या ५०/५४ योजने अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याची तक्रार करण्यात आली.

ठळक मुद्देचौकशीविनाच सिमेंट रस्त्याचे काम सुरू : कमिशन मिळाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यातील रोहणा येथे जिल्हा परिषदच्या ५०/५४ योजने अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याची तक्रार करण्यात आली. मात्र साहायक अभियंत्याने तक्रारदाराला पत्र देऊन साधी चौकशीही केली नाही. यावरून साहायक अभियंता कंत्राटदाराला पाठबळ देत असल्याचा आरोप तक्रारदार सुनील मेश्राम यांनी केला आहे.बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून सिमेंट रस्त्याची चौकशी तक्रारदाराला घेऊन करावी व तसा अहवाल पाठवावा, असे पत्र ८ सप्टेंबरला कार्यकारी अभियंता यांनी सहायक अभियंता यांना दिले तरीही चौकशी होत नसल्याने तक्रारदाराने उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेतली.त्यावेळी त्यांनी साहायक अभियंता यांना फोन करून सिमेंट रस्त्याची चौकशी तक्रारदारांना घेऊन करण्याचे सांगितले. मात्र त्यांच्याही आदेशाला साहायक अभियंत्याने जुमानले नाही. पुन्हा १५ सप्टेंबरला तक्रारदार नवनियुक्त कार्यकारी अभियंत्यांना भेटले. त्यावेळी साहायक अभियंता यांना दूरध्वनीद्वारे तक्रारदाराला सोबत घेऊन निकृष्ट दर्जाचे होत असलेल्या सिमेंट रस्त्याची चौकशी करून सिमेंट रस्ता बघण्यासाठी मला बोलवा असे सांगितले त्यावेळी त्यांचे कक्षात उपकार्यकारी अभियंता हे सुद्धा उपस्थित होते.यावरून सहायक अभियंता किती कार्यतत्पर आहे हे स्पष्ट होते. कार्यकारी अभियंत्याच्या पत्राला केराची टोपली दाखविली व दूरध्वनीवरच बोलण हवेतच विरले.कंत्राटाराला पाठबळ देऊन सिमेंट रस्त्याचे काम सुरूच ठेवून वरिष्ठ अधिकाºयांची व तक्रारदार यांची दीशाभूल सहायक अभियंत्यांनी या ठिकाणी केली आहे.कंत्राटाराला पाच जणांना कमीशन द्यावे लागणार असल्याने व साहायक अभियंता, शाखा अभियंता यांचे निकृष्ट काम करण्यास पाठबळ मिळत असल्याने ठेकेदाराने सिमेंट रस्त्याच्या कामात मोठा गौडबंगाल करणे सुरू आहे. हे काम जिल्हा परिषदेच्या ५०/५४ योजने अंतर्गत मुख्य चौक ते सेलोकर यांच्या घरापर्यंत ३०० मीटर १५ लक्ष रूपये अंदाजपत्रकाचे असून काम करणारी यंत्रणा रोहणा ग्रामपंचायत आहे. चांगल्या योजनांना गालबोट लावण्याचे काम प्रशासनाचे अधिकारी व ठेकेदार करीत आहेत. चौकशी विनाच ठेकेदाराला कामाचे देयके दिल्यास उपोषण करण्याचा इशारा मेश्राम यांनी दिला आहे.