शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

पुरवठा विभागच ‘बीपीएल’च्या यादीत!

By admin | Updated: June 26, 2015 00:49 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ग्रामीण व शहरी क्षेत्रातील नागरिकांना अधिनियमाच्या तरतुदीनुसार धान्य मिळावे,

देवानंद नंदेश्वर भंडाराभंडारा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ग्रामीण व शहरी क्षेत्रातील नागरिकांना अधिनियमाच्या तरतुदीनुसार धान्य मिळावे, गरजू अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी केंद्र शासनासह राज्य शासन नानाविध योजना राबवित आहेत. मात्र, भंडारा जिल्ह्यात अन्न व नागरी पुरवठा विभागात १०८ पैकी ३१ पदे रिक्त असल्याने कामांचा खेळखंडोबा होत आहे. याचा थेट फटका शिधापत्रिकाधारकांना बसत आहे.भंडारा जिल्ह्यात शिधापत्रिका धारकांची संख्या २ लाख ७४ हजार ७७५ आहे. यात अंत्योदय, केशरी, प्राधान्य कुटंूब, अन्नपुर्णा व शुभ्र शिधापत्रिका धारकांचा समावेश आहे. या शिधापत्रिका धारकांपर्यत धान्याचा योग्य पुरवठा व्हावा, त्यांची फसगत होऊ नये, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यात १०८ मंजुर पदे आहेत. यापैकी केवळ ७७ अधिकारी, कर्मचारी सध्यस्थितीत कार्यरत आहेत. ३१ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. मनुष्यबळाअभावी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ताण वाढत आहे. रिक्त पदांमध्ये सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, खरेदी अधिकारी, निरीक्षक अधिकारी, गोदाम व्यवस्थापक, सिमेंट निरिक्षक, शिपाई, गोदाम पहारेकरी यांची प्रत्येकी एक पद, पुरवठा निरिक्षक, हमाल कम स्विपर यांची प्रत्येकी पाच पदे, धान्य खरेदी निरिक्षक, कनिष्ठ लिपिक यांची दोन, वरिष्ठ लिपिक सात व गोदाम लिपिकांच्या तीन पदांचा समावेश आहे.दक्षता समितीची कामे कागदावरचसार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य वाटपावर नियंत्रण ठेवण्यासाठी व वितरित केलेल्या धान्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा, तालुका, स्वस्त धान्य दुकान, नगरपालिका स्तरावर दक्षता समित्या गठित आहेत. मात्र दक्षता समित्यांचे कार्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याच्या काळ्याबाजारावर नियंत्रण आणू शकल्या नाहीत. परिणामी अन्न, नागरी पुरवठा विभागाला शिधापत्रिकाधारकांची नोंद आॅनलाईन करावी लागली आहे. समित्यांचे कार्य कागदावरच आहे.पुरवठा विभागातंर्गत सध्यस्थितीत ३१ पदे रिक्त आहेत. कामांचा वाढता व्याप लक्षात घेऊन रिक्त पदे भरण्यासंबधी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. खाद्य निगमकडून धान्याचा पुरवठा तालुका प्रशासनाकडे केला जातो. गरजू अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा, तालुका प्रशासनासह दक्षता समित्यांची जवाबदारी आहे.- अनिल बन्सोड, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा.