शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सुनील मेंढे यांना ६ लाख ५० हजार विक्रमी मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:49 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या इतिहासात विक्रमी ६ लाख ५० हजार २४३ मते घेत भाजपाचे सुनील मेंढे यांनी विजय संपादित केला. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार ८४९ मते या निवडणुकीत मिळाले असून सुनील मेंढे यांचा १ लाख ९७ हजार ३९४ मताधिक्यांनी विजय झाला.

ठळक मुद्देभंडारा विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक लीड : मेंढे यांना ५२.२३ टक्के तर नाना पंचबुद्धे यांना ३६.३८ टक्के मते

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या इतिहासात विक्रमी ६ लाख ५० हजार २४३ मते घेत भाजपाचे सुनील मेंढे यांनी विजय संपादित केला. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार ८४९ मते या निवडणुकीत मिळाले असून सुनील मेंढे यांचा १ लाख ९७ हजार ३९४ मताधिक्यांनी विजय झाला. मेंढे यांना सहा विधानसभा मतदार संघांपैकी सर्वाधिक लीड भंडारा विधानसभा क्षेत्रात मिळाली.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरूवारी सकाळी ८ वाजता सुरू होवून मध्यरात्री संपली. तब्बल ३३ फेऱ्या मतमोजणीच्या पार पडल्या. प्रत्येक फेरीत भाजपाचे सुनील मेंढे आघाडी घेत असल्याने दुपारीच विजयाचे चित्र स्पष्ट झाले होते. मात्र अंतीम निकाल रात्री २.१५ मिनिटानी घोषित झाला. त्यानंतर विजयी उमेदवार भाजपाचे सुनील मेंढे यांना जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक पार्थ सारथी मिश्रा, उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी उपस्थित होते.या निवडणुकीत भाजपाचे सुनील मेंढे यांना ६ लाख ५० हजार २४३, राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार ८४९, बसपाच्या डॉ. विजया नंदुरकर यांना ५२ हजार ६५९, वंचित बहुजन आघाडीचे कारू नान्हे यांना ४५ हजार ८४२, पिपल्स पार्टी आॅफ इंडिया डेमाक्रॉटीकचे भीमराव बोरकर यांना १ हजार ४६८, भारतीय शक्तीचेतना पार्टीचे भोजराज मरस्कोल्हे यांना ९०५ मते तर अपक्ष निलेश कलचुरी यांना ५४७, प्रमोद गजभिये, ९८०, मिलिंदकुमार जैस्वाल २ हजार ६९९, देविदास लांजेवार १ हजार ५४९, राजेंद्र पटले १३ हजार १४५, डॉ. सुनील चवळे १ हजार ५०७, सुमीत पांडे यांना ३ हजार ३१, सुहास फुंडे यांना ६ हजार ९८३ मते मिळाली. या निवडणुकीत अपक्षांमध्ये सर्वाधिक राजेंद्र पटले यांना १३ हजार १४५ मते मिळाली. १४ उमेदवारांमध्ये आठ अपक्ष उमेदवारांनी आपले भाग्य अजमावले. या आठ अपक्ष उमेदवारांच्या एकूण मतांची बेरीज ३४ हजार ४४४ होते. विशेष म्हणजे सुनील मेंढे व नाना पंचबुद्धे वगळता सर्व १२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात भाजपचे सुनील मेंढे यांना ५२.२३ टक्के तर राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना ३६.३८ टक्के मते मिळाली होती. गत २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार नाना पटोले यांना ५०.६२ टक्के तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना ३८.१६ टक्के मते मिळाली होती.नोटाला दहा हजार ५२४ मतेलोकसभा निवडणुकीत १० हजार ५२४ मतदारांना १४ पैकी कोणताही उमेदवार पसंत नसल्याने त्यांनी नोटाचे बटन दाबले. त्यात ई बॅलेटचे दहा आणि पोस्टल बॅलेटचे १०२ मतदार आहेत.पोस्टल मतात पंचबुद्धेंना आघाडीलोकसभा निवडणुकीत पोस्टल बॅलेटमध्ये मात्र मतदारांनी राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना पसंती दिली. त्यात पंचबुद्धे यांना ४ हजार ३५८, मेंढे यांना ३ हजार ७१ मते मिळाली. ९ हजार १३४ मतदारांनी पोस्टल बॅलेटने मतदान केले. त्यापैकी १०२ मतदारांनी नोटाला मत दिले. तर १ हजार १७३ मते अवैध ठरली.भाजपाला सहाही विधानसभेत आघाडीभाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांनी सहाही विधानसभा क्षेत्रात आघाडी घेतली. सर्वाधिक आघाडी भंडारा विधानसभेत मिळाली. मेंढे यांना १ लाख ३२ हजार ९ मते तर पंचबुद्धे यांना ७७ हजार ४५६ मते मिळाली. भंडारा विधानसभेत ५४ हजार ५५३ मतांची आघाडी मिळाली. भाजपाला तुमसर विधानसभा क्षेत्रात ३६ हजार ६५७, साकोलीत ३२ हजार ४३६, अर्जुनी मोरगाव १५ हजार ९९, तिरोडा २० हजार ७०७, गोंदिया ३८ हजार ४१६ मतांची आघाडी मिळाली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदिया