शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

रविवारी १६ व्यक्ती पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

जिल्ह्यात रविवारी १६ कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आढळल्यानंतर आतापर्यंत एकूण कोरोनाबाधीतांची संख्या २७१ झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी २०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या सर्वांना आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे. तालुका निहाय कोरोनाबाधीतांच्या रुग्णसंख्येवर नजर घातल्यास भंडारा तालुका अव्वल आहे. भंडारा तालुक्यात रुग्ण संख्या ६९, साकोली ५४, लाखांदूर १८, तुमसर ५१, मोहाडी १८, पवनी ३० तर लाखनी तालुक्यात ३१ रुग्णांची संख्या आहे.

ठळक मुद्दे२०७ रुग्ण झाले बरे : आतापर्यंत २७१ व्यक्ती कोरोनाबाधीत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरासह तालुका ठिकाणी दररोज कोरोनाबाधीत रुग्ण आढळत आहेत. शनिवारी पाच रुग्ण आढळल्यानंतर रविवारी तब्बल १६ रुग्ण आढळले. विशेष म्हणजे यात सात रुग्ण भंडारा तालुक्यातील असून तीन तुमसर, साकोली व लाखनी तालुक्यात प्रत्येकी दोन तर पवनी व मोहाडी तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.जिल्ह्यात रविवारी १६ कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आढळल्यानंतर आतापर्यंत एकूण कोरोनाबाधीतांची संख्या २७१ झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी २०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या सर्वांना आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे.तालुका निहाय कोरोनाबाधीतांच्या रुग्णसंख्येवर नजर घातल्यास भंडारा तालुका अव्वल आहे. भंडारा तालुक्यात रुग्ण संख्या ६९, साकोली ५४, लाखांदूर १८, तुमसर ५१, मोहाडी १८, पवनी ३० तर लाखनी तालुक्यात ३१ रुग्णांची संख्या आहे.भंडारा तालुक्यात आढळलेल्या सात पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी ३४ वर्षीय पुरुष कामठी येथून आलेला आहे. याशिवाय ५५ वर्षीय पुरुष, ६२ व ३२ वर्षीय महिला यांचासह १३ व ११ वर्षाचा मुलाचा समावेश आहे. तसेच ११ वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. साकोली तालुक्यातील दोन व्यक्ती पॉझिटिव्ह असून त्यात ४० व ४६ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.मोहाडी तालुक्यात २७ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. लाखनी तालुक्यात दोन व्यक्ती पॉझिटिव्ह असून अनुक्रमे ३३ व २८ वर्षीय आहे. पवनी तालुक्यात एक ७४ वर्षीय वृध्द पॉझिटिव्ह आहे.तुमसर तालुक्यात ४१ वर्षीय पुरुष तर ३५ वर्षीय महिला व दहा वर्षांची मुलगी पॉझिटिव्ह आली आहे. हे तिघेही पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने बाधित झाले आहे. ५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.आयसोलेशन वॉर्डात ७८ रुग्णरविवारपर्यंत आयसोलेशन वॉर्डात ७८ रुग्ण भरती आहेत. या वॉर्डातून ७४० व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात अ‍ॅण्डीजेन टेस्ट किटद्वारे १४३२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १७ व्यक्ती पॉझिटिव्ह तर १४१५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तिव्र श्वासदाहचे १७७ रुग्ण फल्यु ओपीडीमध्ये दाखल आहेत. यापैकी सहा व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह तर १७१ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला.१ लक्ष ११ हजार व्यक्तींजवळ आरोग्य अ‍ॅपजिल्ह्यात कोरोना संदर्भात जनजागृती व रुग्णांची माहिती उपलब्ध करण्यासंदर्भात उपयोगात येणाऱ्या आरोग्य सेतु अ‍ॅपचे लाभार्थी एक लक्ष ११ हजार ०३७ पर्यंत पोहोचले आहे. यातून या नागरिकांना कोरोना विषाणू प्रतिबंध व जनजागृती अंतर्गत माहिती निर्देशित करण्यात येत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या