शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुमो उलटली, पाच जण गंभीर जखमी

By admin | Updated: April 5, 2017 00:17 IST

भरधाव सुमो अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटून वाहनातील पाच जण गंभीर जखमी झाले.

तुमसर : भरधाव सुमो अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटून वाहनातील पाच जण गंभीर जखमी झाले. यात दोन लहान मुली व तीन महिलांचा वाहनातील पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात देव्हाडी शिवारात सकाळच्या सुमारास घडला. रूग्णवाहिका न आल्याने पोलीस व्हॅनने जखमींना रूग्णालयात नेण्यात आले. एकोडी (गोंदिया) येथून नागपूर येथे परमात्मा सेवक मंडळाच्या कार्यक्रमाला वाहन क्रमांक सीजी ०७ - ५१८७ देव्हाडी शिवारात वळणावर अनियंत्रीत झाल्याने उलटली. त्यानंतर एकच जखमींचा आरडाओरड सुरु होती. त्यावेळी तिथून जाणारे पत्रकार महेश गायधने, मोहन भोयर, पवन बालपांडे, प्रा.संजय बुराडे, संतोष पाठक यांना उलटलेले वाहन दिसले. जखमी महिला व दोन लहान मुलींना सुमोचा काच फोडून बाहेर काढले. दरम्यान अपघाताची माहिती तुमसर पोलीस तथा रुग्णवाहिकेला देण्यात आली. अवघ्या दहा मिनिटात तुमसर पोलिसांच्या तीन गाड्या अपघातस्थळी दाखल झाल्या. काही जखमींना एका प्रवाशी गाडीने तर उर्वरीतांना तुमसर पोलीस गाडीने रुग्णालयात हलविण्यात आले. यातील दोन लहान मुलींचे व महिलांचे हात मोडले होते. जखमींच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना भंडारा येथे हलविण्यात आले. जखमीबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. (तालुका प्रतिनिधी)