बघेडा जलाशय अंतर्गत : बघेडा, पवनारा, चिचोली, आंबागड, मिटेवानी येथील समस्यापवनारा : तुमसर तालुक्यातील नामांकित बघेडा जलाशय सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी असून या जलाशयांतर्गत परिसरातील गावे बघेडा, पवनारा, चिचोली, आंबागड, मिटेवानीला सिंचन होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड ९०० ऐकरमध्ये केली. आतापर्यंत जलाशय अंतर्गत सिंचन झाले. पण आता शेवटचा टप्पा म्हणजे ही धानपिके ओंबीवर तर कुणाची पिके वाळण्याच्या मार्गावर असल्यामुळे पाणी अत्यावश्यक आहे. जलाशयामध्ये पाण्याची पातळी नाहीच्या बरोबर असल्यामुळे नहराने पाणी नाहीच्या बरोबर आहे त्यामुळे शेतकऱ्याचा पिकाला ओलीत होऊ शकत नाही. खूप मोठी समस्या निर्माण झाली. पाण्याकरिता रात्रंदिवस शेतकरी तळमळ करीत आहेत.परिस्थितीनुसार जसं जमेल त्या पद्धतीने पाणी देण्याची धावपळ करीत आहे. कदाचित शेतकऱ्यांना पाणी मिळाला नाही तर ५० टक्के नुकसान कोणी थांबवू शकत नाही. अगोदरच शेतकरी कर्जाच्या कचाट्यात सापडले आहेत. आता पुन्हा पाण्याचे संकट.गट नं. १५० मध्ये बघेडा जलाशय १५७ एकरमध्ये असून साठवण क्षमता ५.५० मीटर आहे. उन्हाळी धान पिकाकरिता बावनथडी प्रकल्पामधून जानेवारी महिन्यात ५.५० मीटर पाणी मिळाले असून सध्याच्या परिस्थितीत शून्य गेज आहे. सदर जलाशयामध्ये बावनथडी प्रकल्पाचे पाणी ताबडतोब सोडणे गरजेचे आहे. अन्यथा नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
पाणी टंचाईमुळे उन्हाळी धानपीक संकटात
By admin | Updated: May 17, 2016 00:24 IST