शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदी पुलावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:12 IST

तुमसर गोंदिया राज्य मार्गावर माडगी शिवारात वैनगंगा नदी पुलावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर पुलावरील लोखंडी सळाखी उघड्या पडल्या आहेत. वाहने खचक्यावरून वर उसळतात. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. रहदारीच्या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांचा जीव धोक्यात : कामाचे आदेश केव्हा निघणार?

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर गोंदिया राज्य मार्गावर माडगी शिवारात वैनगंगा नदी पुलावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर पुलावरील लोखंडी सळाखी उघड्या पडल्या आहेत. वाहने खचक्यावरून वर उसळतात. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. रहदारीच्या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.माडगी शिवारात वैनगंगा नदी पुलावर मोठे खचके सहा ते सात ठिकाणी पडले आहेत. उंच भाग वाहनधारकांना दिसत नाही. भरधाव वाहने या खचक्यावरून उसळी मारतात. वाहन अनियंत्रित होवून अपघातग्रस्त होण्याची येथे शक्यता आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांना यापूर्वी येथे अपघात घडले आहेत. या पुलावर तीन ते चार ठिकाणी खड्डे पडून पुलाच्या लोखंडी सळाखी उघड्या आहेत. हे खड्डे धोकादायक आहेत. दुचाकी व चारचाकी वाहन पंक्चर होवून अनियंत्रित होण्याची शक्यता येथे बळावली आहे. सदर पुल दुरुस्तीची निविदा प्रकाशित झाली. परंतु अजूनपर्यंत संबंधित कंत्राटदाराला कामाचे आदेश प्राप्त झाले नाही अशी माहिती आहे.अतिशय वर्दळीचा हा मार्ग असून सदर पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. कासवगतीने कागदोपत्री कामे येथे सुरु असून मोठ्या अपघाताचीे येथे संबंधित विभाग प्रतिक्षा करीत आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.वैनगंगा पुलावरील दुरुस्ती कामांची निविदा मंजूर झाली आहे. या कामाचे आदेश लवकरच निघणार असून कामाला सुरुवात होणार आहे.- पी.एन.माथुरकर,कनिष्ठ अभियंता मोहाडीमाडगी शिवारातील वैनगंगा नदी पुलावर खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे केली नाही तर आंदोलन करण्यात येईल.-के.के. पंचबुद्धे,जि.प. सदस्य, देव्हाडी