शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गौरक्षण शाळेत होणार खत निर्मिती केंद्र

By admin | Updated: September 14, 2015 00:23 IST

चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थानात प्रथमत:च गौरक्षण शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. आता या शाळेत खत निर्मिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित : जनावरांना मिळणार वर्षभर हिरवा चाराचुल्हाड (सिहोरा) : चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थानात प्रथमत:च गौरक्षण शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. आता या शाळेत खत निर्मिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या कार्यासाठी स्वतंत्र यंत्रणा क्रियान्वित करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अजय खंगार व सचिव तुलाराम बागडे यांनी दिली. चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थान परिसरात भक्तांसाठी ट्रस्ट व्यवस्थापन मंडळाच्या वतीने प्रथमत:च गौरक्षण शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. भक्त भाविक या देवस्थानात श्रद्धेने गौमाता दान स्वरुपात देत आहे. या जनावरांचे संगोपन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. या कार्यात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जंगल शेजारी देवस्थान असल्याने हिंसक वन्य प्राण्यांचा मुक्त संचार आहे. गौरक्षण केंद्रातील जनावरांना सुरक्षा देण्यासाठी केंद्राला लोखंडी जाळी लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रात्री या जनावरांवर सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून निगराणी केली जाणार आहे. या देवस्थानात नवस फेडतांना जनावरे दान करण्याची परंपरा जुनीच आहे. आधी केंद्राची सोय नसल्याने निधी देण्याची परंपरा होती. परंतु यात भाविकांना समाधान होत नव्हते. त्यांची समस्या व श्रद्धा लक्षात घेवून गौरक्षण केंद्र स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. या केंद्रात जनावरांची संख्या वाढत असल्याने संगोपनासाठी एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याला मानधन दिले जात आहे. या जनावरापासून प्राप्त होणाऱ्या शेणापासून खत निर्मिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या खताचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना झाला पाहिजे, या करीता कृषी तज्ज्ञ तथा कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची मदत घेतली जणार आहे. देवस्थानातील गौरक्षण केंद्रातील जनावरांना वर्षभर हिरवा चारा प्राप्त होणार आहे. या शिवाय पिण्याचे पाणी समस्या निकाली निघणार आहे. या जनावराचे आजार आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत जनावरांना सुरक्षा देणार आहे. (वार्ताहर)