शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुगरण पक्ष्यांची होणार आता गणना

By admin | Updated: June 4, 2017 00:15 IST

मागील काही वर्षांत वाढती लोकसंख्या आणि वाढते सिमेंटचे जग त्यामुळे सुगरण पक्षी दृष्टिस पडणे दुर्लभ होत आहे. सुगरण पक्ष्यांची कमी होत जाणारी संख्या लक्षात घेता,...

पर्यावरणदिनाचे औचित्य : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेचा पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील काही वर्षांत वाढती लोकसंख्या आणि वाढते सिमेंटचे जग त्यामुळे सुगरण पक्षी दृष्टिस पडणे दुर्लभ होत आहे. सुगरण पक्ष्यांची कमी होत जाणारी संख्या लक्षात घेता, यंदाच्या पर्यावरण दिनाचे (५ जून) औचित्य साधून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेने सुगरण पक्ष्यांची गणना करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ही गणना ४ जून ते १२ जूनपर्यंत करण्यात येणार आहे.या उपक्रमात पक्षीप्रेमी, वनविभागाचे अधिकारी, वन्यजीव स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बीएनएचएसने केले आहे. या पक्ष्यांच्या संख्येचा अंदाज आल्यास त्यांच्याबद्दल जाणीवजागृती करणे, त्यांचे अधिवास असलेले गवताळ प्रदेश वाचविणे व त्यातून त्यांची संख्या वाढविणे, असे प्रयत्न करता येणार आहेत. बीएनएचएसच्या कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्रामअंतर्गत या मोजणी उपक्रमाचे देशभरात आयोजनकेले जाणार आहे. या उपक्रमात ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी त्यांच्या आवडीची कोणतीही जागा निवडावी आणि त्या अधिवासातील सुगरण पक्ष्यांची संख्या मोजावी, असे या गणनेचे स्वरुप असल्याचे बीएनएचएसचे जिल्हा समन्वयक स्वप्नील वानखेडे यांनी सांगितले.‘खोप्या मंदी खोपा’ सुगरण पक्षी म्हटला की, अनेकांना आठवते ती बहिणाबार्इंची ‘खोप्या मंदी खोपा’ पाठ्यपुस्तकात वाचलेली कविता. दैनंदिन आयुष्यात सुगरणींचे खोपे सगळ्यांनी ठिकठिकाणी बघितले असतील. सुगरण पक्षी कसा दिसतो, हे अनेकांना माहीत नसते, पण त्याचे काटेकोर विणलेले घरटे मात्र सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. सुगरण पक्षी हा विणकर, गवळण या नावांनीही परिचित आहे. बाया सुगरण, स्ट्रेक सुगरण, ब्लॅक ब्रेस्टेड सुगरण, फिन सुगरण (पिवळा) आदी सुगरणच्या प्रजाती आहेत.