शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
2
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
3
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
4
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
5
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
6
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
7
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
8
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
9
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
11
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
12
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
13
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
14
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
15
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
16
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
18
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
19
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
20
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

अवकाळी पावसाचा रब्बीला फटका

By admin | Updated: March 9, 2017 00:32 IST

जिल्ह्यात मागील २४ तासांत बरसलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाला फटका बसला आहे.

शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट : आम्रवृक्षांचा बहर झडला, हरभरा, लाख-लाखोळी, गहू, भाजीपाला पीक धोक्यातभंडारा : जिल्ह्यात मागील २४ तासांत बरसलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाला फटका बसला आहे. विशेषत: आम्रवृक्षांचा बहर झडल्याने गावरान आंब्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे गारपीट न पडल्याने शेतमालाची नासाडी जास्त प्रमाणात झाली नाही. भंडारा : भंडारा शहरात बुधवारी रात्री २ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला. जवळपास २० मिनिटांपर्यंत हा अवकाळी पाऊस सुरुच होता. रब्बी पिकांचे किती नुकसान झाले याचे नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पालांदूर परिसरात १५.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. वीज पुरवठाही खंडीत होत होता. काही शेतशिवारात पाणी साचल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. भाजीपाला पिकांमध्ये वांगी, भेंडी, चवळीच्या शेंगा, मिरची पिकांमध्ये पाणी शिरले आहे. परिणामी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागणार आहे. चिचाळ : या परिसरात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जातो. मात्र अवकाळी वादळी पावसाने झोडपल्याने कांदयाची उभी रोपे जमीन दोस्त झाल्याने या परिसरात मोठी हानी झाली आहे. पवनी : तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कापलेले गव्हाचे पीक ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवलेले आहे. मात्र अवकाळी पावसाने पीक ओले झाले आहे.साकोली :तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने धानाच्या शेतीला फायदा झाला तर कुठे नुकसान झाले आहे. सध्या उन्हाळी धानपिकाची रोवणी आटोपली आहे. आधीच भारतीयमनामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात उडीद, मुंग, चना लाखोरी यासारख्या कठाण माफ पडून आहे. या कठाण मालाला मात्र या अकाली पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. (लोकमत चमू)सरासरी ९ मिमी पाऊसजिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी ९.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. यात भंडारा तालुक्यात १२ मि.मी., मोहाडी २ मि.मी., पवनी १५.२, साकोली ४.२, लाखांदूर १९.२, लाखनी १३.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तुमसर तालुक्यात पावसाची नोंद निरंक आहे. एकुण पावसाची नोंद ६६ मि.मी. असून त्याची सरासरी ९.४ आहे.