शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

असेही धाडस! रूपालीने पळवून लावला वाघ; भंडारा जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 19:27 IST

एका तरूणीने हिंमतीच्या बळावर जंगलाच्या राजाला पळवून लावल्याची सत्य घटना आहे. अंगावर थरकाप उडविणारी ही घटना साकोली तालुक्यातील ऊसगाव येथील असून रूपाली राजकुमार मेश्राम असे या जिगरबाज तरूणीचे नाव आहे.

ठळक मुद्देआईसह स्वत:चे वाचवले प्राण उपचारासाठी आर्थिक मदत मिळेना

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मध्यरात्रीची वेळ. घराबाहेर बांधलेल्या शेळीने माणसासारखा हंबरडा फोडला. काय झाले, हे बघण्यासाठी २१ वर्षीय तरूणीने दार उघडला. कुठेही काहीच दिसले नाही, पण शेळी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तरूणी मागे वळली. एवढ्यात कुणाची तरी सावली तिला दिसली. तरूणीने पुन्हा दाराकडे वळून बघितले. समोर साक्षात जंगलाचा राजा ऐटीत उभा. क्षणाचाही विलंब न लावता वाघाने तरूणीवर हल्ला चढविला. दोघांच्या झुंजीत विजय शेवटी तरूणीचा झाला.ही कुठल्या एका चित्रपटातील ‘स्टोरी’ नव्हे तर एका तरूणीने हिंमतीच्या बळावर जंगलाच्या राजाला पळवून लावल्याची सत्य घटना आहे. अंगावर थरकाप उडविणारी ही घटना साकोली तालुक्यातील ऊसगाव येथील असून रूपाली राजकुमार मेश्राम असे या जिगरबाज तरूणीचे नाव आहे. या हल्ल्यात रूपाली व तिची आई जखमी झाली. जिजाबाई स्वस्थ असून रूपालीवर मात्र नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.२४ मार्च २०१८च्या मध्यरात्रीच्या सुमारस हा घडलेला थरारक प्रकार रूपाली आजही निर्र्भयतेने सांगते. वाघाने हल्ला चढविताच रूपालीच्या डोक्यावर, कमरेवर दोन्ही हात व पायावर जबर दुखापत झाली. रक्ताची धार वाहू लागली. काय करावे, सुचेना. पण लढण्याची हिंमत कमी होत नव्हती. वाघ दिसताच भल्यांभल्याची दातखीळ बसते. पण रूपाली विचलीत झाली नाही. वाघाला प्रतिउत्तर देत असतानाच आई जिजाबाईनेही काठीने वाघावर प्रहार केला. यात वाघाने जिजाबाईवरही हल्ला केला. हिंमतीच्या बळावर वाघाला पळवून लावायचंच, असा चंग बांधून रूपालीने पुन्हा त्याच्यावर प्रहार केला. या प्रहाराने वाघाच्या मनात भीती आली असावी आणि क्षणार्धात त्याने तिथून धूम ठोकली. या ठिकाणी घरे दूरवर असल्याने आवाजही शेजाऱ्यांना पोहचेना. वाघाने पळ काढल्यानंतर दरवाजा बंद केला. रक्ताच्या थारोळ्यात असतानाही हिंमतीने रुपालीने मोबाईलवरून फोन करून घडलेली घटना कळविली..दोघींनाही लगेचच उपजिल्हा रूग्णालय साकोली येथे दाखल करण्यात आले. दोन दिवसांच्या उपचारानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात ‘रेफर’ करण्यात आले. रूपालीला गंभीर दुखापत असल्याने तिला नागपूर येथील मेडिकल कॉलेजला ‘रेफर’ करण्यात आले. घटनेला आठ दिवसांचा कालावधी लोटला असला तरी वनविभागातर्फे या मायलेकींना आर्थिक मदत मिळालेली नाही. हातात जेवढी रक्कम होती खर्च झाली. औषधोपचाराला पैसा लागत नाही. पण इतर खर्च पूर्ण करण्यासाठी अंगावरील सोने-चांदीचे खळेही मेश्राम यांनी विकले. घरात अठराविश्व दारिद्रय. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या रूपालीला या घटनेने बळ जरूर दिले, पण आर्थिक मदत मिळालेली नाही.

टॅग्स :Tigerवाघ