मोहन भोयर।आॅनलाईन लोकमततुमसर : केंद्र व राज्य शासन वृक्ष लागवड व पाणी व्यवस्थापन नियोजनाकरिता दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्चून करीत आहे, परंतु सितेपार ग्रामपंचायतीने लोकसहभागातून सितेपार येथे दोन हजार वृक्षांची लागवड स्वखर्चाने करून गाव शिवार हिरवेगार केले आहे. गावाशेजारी पाण्याची पातळी रहावी व शेतीला पाणी मिळावे याकरिता पाणी अडवून तलावाची निर्मिती केली. गाव करी ते राव न करी अशी म्हण या गावाने सार्थक केली आहे. येथील युवा सरपंच गजानन लांजेवार व सहकाºयांच्या कल्पकतेने ही किमया घडविली.तुमसरपासून सहा कि़मी. अंतरावर सितेपार नावाचे लहानसे गाव आहे. गावाची लोकसंख्या सुमारे २२०० इतकी आहे. सरपंच गजानन लांजेवार व त्यांच्या सहकाºयांनी पर्यावरण रक्षण व जलव्यवस्थापन गावात उत्कृष्ठ असावे. बघता क्षणी गाव सुंदर वाटावे, असे स्वप्न बघितले. गाव हिरवेगार झाल्याशिवाय सुंदर दिसणार नाही. याकरिता गावाजवळील रिकामम्या जागेवर वृक्ष लागवडीचा प्रस्ताव ठेवला. तुमसर वनपरिक्षेत्र अधिकाºयांना भेटून स्वखर्चाने वृक्ष लागवड व वृक्षसंगोपनाची जबाबदारी घेत असल्याचे सांगितले. रितसर परवानगी घेऊन वृक्ष लागवड करण्यात आली. सुमारे दोन हजार झाडांची लागवड करण्यात आली. गावाला जातांनी रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली आहे. ही झाडे येणाºया जाणाºयांचे लक्ष वेधून घेताल.सितेपार येथे नाला आहे. शेतशिवारातील पाणी पावसाळ्यात व्यर्थ वाहून जातो. ही बाब सरपंच गजानन लांजेवार यांच्या लक्षात आली. गावाबाहेर ओसाड व जुने मालगुजारी तलाव होते. त्या तलावात शेतशिवारातील पाणी वळते केले. शासकीय निधीतनू एक बंधारा येथे तयार केला आहे. सध्या या तलावात पाण्याचा साठा उपलब्ध राहतो. तलावामुळे गावातील विहिरीत पाणी साठा वाढीकरिता मदत होत आहे. ग्रामस्थांनी येथे श्रमदानही केले आहे. गाव शिवार हिरवेगार झाले आहे. राजकीय इच्छाशक्ती व गावकºयांची साथ यामुळे शासकीय निधी विनाही गावाचे संपूर्ण रूपच बदलून जाते हे येथे दिसून येते.सितेपार ग्रामपंचायतीने स्वखर्चाने सुमारे दोन हजार झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली आहे. पाणी व्यवस्थापनाकरिता नव्याने तलाव तयार करण्यात आला आहे. गावाचा चेहरामोहरा बदलविणार आहे.-गजानन लांजेवार,सरपंच सितेपार.
वृक्ष लागवड व तलाव बांधकामाचा यशस्वी प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:51 IST
केंद्र व राज्य शासन वृक्ष लागवड व पाणी व्यवस्थापन नियोजनाकरिता दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्चून करीत आहे, परंतु सितेपार ग्रामपंचायतीने लोकसहभागातून सितेपार येथे दोन हजार वृक्षांची लागवड स्वखर्चाने करून गाव शिवार हिरवेगार केले आहे.
वृक्ष लागवड व तलाव बांधकामाचा यशस्वी प्रयोग
ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : गाव हिरवेगार, सितेपार ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम