शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिद्दीच्या बळावर खेचून आणले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:12 IST

मनात जिद्द असली की कुठलीही बाब अशक्य नाही. अशावेळी फक्त मेहनत व प्रयत्नावर यशाची भिस्त अवलंबून असते. असेच प्रेरणादायी यश एका १४ वर्षीय खेळाडू असलेल्या संचारी सुनिल भोवते हिने खेचून आणले आहे.

ठळक मुद्देप्रेरणादायी वाटचाल : संचारी भोवतेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : मनात जिद्द असली की कुठलीही बाब अशक्य नाही. अशावेळी फक्त मेहनत व प्रयत्नावर यशाची भिस्त अवलंबून असते. असेच प्रेरणादायी यश एका १४ वर्षीय खेळाडू असलेल्या संचारी सुनिल भोवते हिने खेचून आणले आहे.संचारी ही भंडारा (उमरी) येथील महर्षी विद्या मंदिर शाळेची इयत्ता नववीची विद्यार्थीनी असून तिने नुकतेच दिल्ली येथे झालेल्या ‘खेलो इंडिया खेलो’ या स्पर्धेअंतर्गत व्हॉली बॉल स्पर्धेत रजत पदक प्राप्त केले आहे. व्हॉली बॉल व धावण्याच्या स्पर्धेत सातत्याने भाग घेणारी संचारी ही अभ्यासामध्येही तेवढीच हुशार आहे. विज्ञान, गणीत, हिंदी, संगणक, सामाजिक शास्त्र आदी विषय शिकत असलेल्या संचारीला खेळण्याची सवय बालपणापासूनच. आई संध्या भोवते या क्रीडा शिक्षक असल्याने क्रिडांगणातील विविध खेळांचे बाळकडू सातत्याने मिळत राहिले. इयत्ता पाचवी पासून व्हॉलीबॉल खेळत असलेल्या संचारीने खेलो इंडिया खेलो या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेतली. तालुका, जिल्हास्तरीय विभागीय स्तरीय व त्यानंतर राज्यस्तरावर सहभाग घेवून दिल्ली येथे होणाºया राष्टÑीय स्पर्धेसाठी दमदार एन्ट्री मारली. शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जावा असे उत्कृष्ट खेळ सादर करुन संचारीने रजत पदकाचा मान मिळविला. अव्वल स्थान प्राप्त करता आले नाही अशी खंतही तीने व्यक्त केली असली तरी भविष्यात अव्वल येण्याचा आपला मानस असल्याचेही तिने प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.तिच्या या यशामागे शाळेच्या प्राचार्य श्रृती ओहळे, क्रीडा शिक्षक तथा मार्गदर्शक एन.एस. उईके व आई-वडीलांचा मोलाचा वाटा आहे. संचारीचे वडील पोलीस विभागात कार्यरत असून तिचा मोठा भाऊ बीबीए अंत्य वर्षात शिक्षण घेत आहे. चार्टेड अकांउटंट किंवा खेळाच्या माध्यमातून भविष्यात रेल्वेत किंवा सिव्हील एव्हीएशनमध्ये कार्य करण्याची तिची ईच्छा आहे.