शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मेहनत, चिकाटीमुळेच स्पर्धा परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:36 IST

केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असल्यास मेहनत आणि चिकाटीशिवाय पर्याय नाही. या परीक्षांची तयारी मानसिकदृष्टया करणे गरजेचे असून परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक पातळीवर स्वत:ला सिध्द करणे म्हणजेच स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणे होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मतदारजागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असल्यास मेहनत आणि चिकाटीशिवाय पर्याय नाही. या परीक्षांची तयारी मानसिकदृष्टया करणे गरजेचे असून परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक पातळीवर स्वत:ला सिध्द करणे म्हणजेच स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणे होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सामाजिक न्याय विभाग भंडारा यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम तसेच निवडणूक विभागाच्या वतीने मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.केंद्रीय लोकसेवा परीक्षा पास होवून भंडारा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प या पदावर रुजु झालेले श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, गटविकास अधिकारी धीरज पाटील, राहूल काळे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.श्रीकृष्णनाथ पांचाळ म्हणाले की, प्रथम परीक्षेचा अभ्यास करा व नंतर परीक्षेसाठी अभ्यास करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना यश हमखास मिळेल हा विचार डोक्यात ठेवून तयारी न करता मेहनत आणि जिद्द डोक्यात ठेवून तयारी करावी. यश केव्हा मिळेल याची खात्री नसल्यामुळे नाउमेद न होता सातत्य व मनाचा दृढ संकल्पच यशाची शिखरे सर करु शकतात.प्रत्येकाने कर्तव्य भान जपणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेची तयार करण्यासाठी शासनाच्या अनेक संस्था आहेत. या संस्थांमध्ये परीक्षेची संपूर्ण तयारी करुन घेतली जाते. स्पर्धा परीक्षेसाठी आर्थिक स्तर महत्वाचा नसून मनाची तयारी महत्वाची असते. नियमित वाचन, भाषेवर प्रभुत्व, नोटस् काढणे, गट चर्चा याबाबी परीक्षा पास होण्यासाठी गरजेच्या आहेत.जिद्द, मेहनत, नियोजन, मानसिक तयारी , न्युनगंड न बाळगणे व स्वत:ला सिध्द करण्याचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळते, असे उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले.यावेळी बोलतांना उपजिल्हाधिकारी महिरे म्हणाले की, मेहनतीशिवाय स्पर्धा परीक्षेस पर्याय नाही. आपण ठरविलेले लक्ष गाठण्यासाठी नियमित अभ्यास व नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक न्यायभवनातील भंडारा शहरातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.