शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By admin | Updated: June 29, 2017 00:45 IST

मांगली जोडरस्ता बोरगाव गावाजवळ २२ जून रोजी मांगली चौ. येथील प्राची मोतीलाल मांडवकर हिला भरधाव वेगाने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडले ती जागीच गतप्राण झाली.

सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी : प्रकरण अवैधरेती वाहतुकीचेलोकमत न्यूज नेटवर्कपवनी : मांगली जोडरस्ता बोरगाव गावाजवळ २२ जून रोजी मांगली चौ. येथील प्राची मोतीलाल मांडवकर हिला भरधाव वेगाने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडले ती जागीच गतप्राण झाली. तहसलिदार पवनी यांचे रेतीघाटावरून अवैध उत्खनन व ओव्हरलोड वाहतूक यावर अजिबात नियंत्रण नाही. त्यामुळे रेती तस्कर व त्यांच्या ट्रक-टिप्परचे चालक राजरोसपणे अवैध व ओव्हरलोड रेती वाहतूक करीत आहेत. याप्रकरणी दोषी असलेल्या तहसलिदाराला जबाबदार धरून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्रकार परिषदेत राज्यात सत्तारूढ असलेल्या भाजपा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी भंडारा यांना पाठविलेल्या निवेदनात अपघात प्रकरणी मांगली येथील निरपराध नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे व दोषी असलेल्या तहसिलदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे. पवनी व लाखांदूर तालुक्यातील रेतीघाटावरून रेतीची अवैध तस्करी होत आहेत. ओव्हरलोड रेती वाहतूक करीत असल्याने भरधाव वेगाने रात्रंदिवस ट्रक व टिप्पर चालत आहेत. वर्षभरात ओव्हरलोड वाहतुकीने २० पेक्षा अधिक लोकांचे बळी घेतलेले आहेत व कित्येक हात पाय गमावून बसलेले आहेत. मात्र प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. बोरगाव येथील अपघाताने परिसरातील नागरिक रस्त्यावर आले व त्यांनी आंदोलन केले. आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानीस मांगली येथील काही नागरिकांना दोषी धरून त्यांचेवर गुन्हे दाखल केले जात आहेत. हा अन्याय थांबवावा त्यांचेवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे व खरे गुनहेगार शोधण्याचे काम पोलिसांनी करावे, अशी मागणी भाजपा शहर अध्यक्ष हरिश तलमले यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला माजी जि.प. सभापती हंसा खोब्रागडे, भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, जिल्हा पदाधिकारी राजेंद्र फुलबांधे, अमोल तलवारे, मयुर रेवलकर, गुलाब सिंधीया व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.