शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेवर विद्यार्थी आज धडकणार

By admin | Updated: July 3, 2017 00:46 IST

जांभोरा येथील जिल्हा परिषद पूर्ण माध्यमिक शाळेत मुख्याध्यापकांसह तीन शिक्षकांचे पद रिक्त आहेत.

जांभोरा येथील शाळा बंद आंदोलन : तोडगा न काढल्याने रोषाचे वातावरणलोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : जांभोरा येथील जिल्हा परिषद पूर्ण माध्यमिक शाळेत मुख्याध्यापकांसह तीन शिक्षकांचे पद रिक्त आहेत. मागील वर्षांपासून केवळ प्रशासनाने आश्वासन दिले मात्र कायम शिक्षक दिले नाही. त्यामुळे येथे शिक्षकांचे पद रिक्त असल्याने जांभोरा येथील विद्यार्थी सोमवारला जिल्हा परिषदेवर धडकणार आहेत.शिक्षकांवर कामांचा ताण निर्माण झालेला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. त्याविरोधात ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शिक्षकांच्या मागणीसाठी २६ जून पासून शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. मात्र, प्रशासनाने अजूनही योग्य तो तोडगा काढलेला नसल्याने सोमवार विद्यार्थी जिल्हा परिषदेवर धडक देणार असल्याचे आंदोलकांनी कळविले आहे.मोहाडी पंचायत समितीचे उपसभापती, जांभोरा ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी कायमस्वरुपी शिक्षकांच्या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन २६ जून पासून सुरु केले. पालकांनी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करून शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे शिक्षकांना शाळेत जाता येत नाही. शिक्षक नियमित शाळेपर्यंत पोहचत असून शाळा बंद असल्याने कागदावर सह्या करून ते कागद भिंतीवर लावले जात आहे. पालकांची मागणी न्याय असून कामांचा ताण त्यामुळे वाढत असल्याने शिक्षकांची भरती झाली पाहिजे, अशी भावना शिक्षकांनी पालकांच्या आंदोलनादरम्यान व्यक्त केली.आंदोलनादरम्यान खंड विकास अधिकारी कृष्णा मोरे यांनी शाळेला भेट देवून आंदोलकांशी चर्चा केली. एक कायमस्वरुपी तर दोन शिक्षक तात्पुरते देण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, कायमस्वरुपी शिक्षकांच्या मागण्यांवर पालक व आंदोलनकर्ते अडून बसल्याने तोडगा निघाला नाही. मागील वर्षीप्रमाणे प्रशासन वेळ काढण्यासाठी लॉलीपॉप देत असल्याची भावना आंदोलकांची झाल्याने तोडगा निघाला नाही.गट शिक्षणाधिकारी रमेश गाढवे यांनी सुद्धा शुक्रवारी भेट घेऊन आंदोलनकांशी चर्चा केली. आंदोलक कोणत्याही परिस्थितीत कायम स्वरुपी शिक्षकांच्या मागण्यांवर ठाम असल्याने तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलक सोमवार शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेवर धडक देणार आहे. यावर जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.