तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील जिल्हा परिषद विद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती धनेंद्र तुरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य अरविंद राऊत, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी भारतभूषण सोळुंके, प्राचार्य ओ. बी. गायधने, सरपंच मधू अडमाचे, उपसरपंच देवशीला तुरकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भालेश्वर तुरकर, ग्रामविकास अधिकारी मेघराज हेडाऊ, जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद मिसाळकर, राजेश निमजे, तेजराम ठाकरे, श्रीराम ठाकरे, सुशील कुंभारे, भाऊराव राऊत, जी. पी. सार्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी सभापती धनेंद्र तुरकर, आनंद मलेवार, दिनेश बिसने, काजल सरोदे, सिमरन पाठक, अमृत पराते, भाग्यश्री मसकी, पूनाजी देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. संचालन एन. एल. गडदे यांनी केले, तर आभार एम. एस. टेभरे यांनी मानले. कार्यक्रमाला एस. डी. देशमुख, आर. एल. गभने, एम. एस. शरणागत, पी. पी. उके, ए. जी. तुरकर, जे. एच. बनकर, के. के. पंचभाई, ए. आर. गोटेफोडे, एन. एम. चौरे, वाय. एस. कटरे यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी संतांचे विचार अंगिकारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST