शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

विद्यार्थ्यांनी केली पवनीनगरी प्रफुल्लमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:35 IST

पवनी येथील वीर शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना आदरांजलीचा कार्यक्रम पार पडला.

ठळक मुद्देशहिदांच्या जयघोषाने निनादली पवनी

आॅनलाईन लोकमतपवनी : पवनी येथील वीर शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना आदरांजलीचा कार्यक्रम पार पडला. यात विद्यार्थ्यांनी काढलेल्या शांतता रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ‘शहीद प्रफुल्ल मोहरकर अमर रहे’ च्या घोषणा देवून पवनीनगरी प्रफुल्लमय केली.शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना आदरांजली, शांतता रॅली व सैन्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम पवनीतील युवकांनी पुढाकार घेऊन आयोजित केला होता. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा सैनिकी अधिकारी लेफ्टनंट नितीन पांडे, कम्युनिकेशन विंग सार्जंट चंद्रशेखर कुलकर्णी, फ्लॉईट इंजिनिअर वारंट आॅफीसर लक्ष्मीकांत वांदद्रोणकर, आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष पूनम काटेखाये व शहिद प्रफुल्ल यांच्या आई सुधाताई , वडील अंबादास मोहरकर, पत्नी अबोली मोहरकर हे उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी मनापासून संवाद साधला. ते म्हणाले, आजच्या पिढीला आदर्श नसल्याची ओरड होत असते. मात्र शहीद प्रफुल्लसारखे आदर्श आमच्या समाजात आहेत. आपण अगदी सुरुवातीपासूनच विद्यार्थी दशेत मेहनत प्रामाणिकपणा व जिद्द ठेवली पाहिजे. देशभक्तीपर प्रोत्साहनपर कार्यक्रमांना कुठलाही निधी कमी पडू देणार नाही असे जाहीर प्रकटन मंचावरून त्यांनी करताच सर्व उपस्थितांनी व विद्यार्थ्यांनी कृतज्ञतापूर्व कटाक्षाने त्यांचे आभार मानले. निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांनी पवनीचे विद्यार्थी शिस्तबद्ध असून त्यांच्यात निश्चितच देशभक्ती असल्याचे सांगितले. सैन्यात भरती होण्यासाठी सर्वच घटकांना त्यांनी यथोचित मार्गदर्शन केले. आमदार अवसरे यांनी येथील जनतेनी दाखविलेल्या सहकार्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली.सुधाताई मोहरकर यांनी शहीद प्रफुल्ल यांच्या आठवणी सांगताना म्हणाल्या, प्रफुल्ल लहान असताना वाचन व वक्तृत्व यावर भर देत होता. प्रफुल्ल निर्भीड होता. त्याच्यात नेतृत्वगुण कुटून भरलेले होते. माझ्या मुलाने माझा व पवनीचा मानसन्मान वाढविला असून याच मातीचा गंध त्याच्या हौतात्म्याने आले असल्याचे अभिमानाने सांगितले. सुनिल मोटघरे यांनी शहीद प्रफुल्ल यांच्या जीवनावर तयार केलेला व्हीडीओ व शहीद प्रफुल्ल यांच्या मित्राने लिहिलेली कविता वाचून दाखविताच उपस्थितांच्या डोळ्यात गौरवाश्रू तरळले. कार्यक्रमाकरिता सुनिल मोटघरे, मच्छिंद्र हटवार, राजेश चोपकर, विलास येलमुले, सुनिल हटवार, देवराज बावनकर, संदीप नंदरधने, किशोर जिभकाटे यांनी सहकार्य केले.