शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:07 IST

शैक्षणिक कागदपत्रे देत नाही व इतर सुविधा न पुरविल्याबाबत अंजनिया तंत्रनिकेतन खैरलांजी, तुमसर येथील विद्यार्थ्यांनी एनएसयुआय विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी आंदोलन करून कॉलेज व्यवस्थापनाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या ताफा महाविद्यालयात दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

ठळक मुद्देप्रकरण अंजनिया तंत्रनिकेतनचे : शैक्षणिक प्रमाणपत्रे परत करण्याची मागणी

लोकमत न्युज नेटवर्कतुमसर : शैक्षणिक कागदपत्रे देत नाही व इतर सुविधा न पुरविल्याबाबत अंजनिया तंत्रनिकेतन खैरलांजी, तुमसर येथील विद्यार्थ्यांनी एनएसयुआय विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी आंदोलन करून कॉलेज व्यवस्थापनाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या ताफा महाविद्यालयात दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.खैरलांजी, तुमसर येथे अंजनिया तंत्रनिकेतन असून २०१७ मध्ये कॉलेज सुरु करण्यात आले होते. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. येथे शिक्षकवृंद नाही, नियमित प्राचार्यांची नियुक्ती नाही.विद्यार्थ्यांकडून विविध कारणावरून शुल्क आकारणी करण्यात आली. परंतु सुविधा देण्यात आली नाही. विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारला तर आत्महत्या करण्याची धमकी देण्यात येते. यानंतर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कागदपत्रे मागितली तर जबाबदारी झटकली जात आहे. कॉलेज सचिवाने बस सेवा, गणवेश, गेस्ट प्राध्यापक, औद्योगिक सहल, उपहारगृह, वस्तीगृह सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. ग्रंथालयात अभ्यासक्रमाची पुस्तके नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी संतप्त होवून शुक्रवारी कॉलेजमध्ये दाखल होवून शैक्षणिक कागदपत्रांची मागणी केली. कॉलेजला कुलूप लावण्याचा इशारा संतप्त विद्यार्थ्यांनी दिला होता.येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे तात्काळ परत न केल्यास आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. या प्रकरणात संतप्त विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाविरोधात तुमसर पोलिसात रितसर तक्रार दाखल केली. यावेळी सचिव व उपप्राचार्य यांचेकडून संतप्त विद्यार्थ्यांनी राजीनामा देण्यास भाग पाडले. सदर कॉलेजमध्ये अभियांत्रिकी पदविकेच्या पाच शाखा आहेत. एन.एस.यु.आय. चे शुभम पडोळे यांनी व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी कॉलेज व्यवस्थापनाने तुमसर पोलिसांनी पाचारण केले होते.