आतापर्यंत ६४५ युवकांना रोजगार : शासनाची एकमेव रोजगाराभिमुख संस्थासिराज शेख मोहाडीस्टार रोजगार प्रशिक्षण संस्था भंडाराचे एकमेव प्रशिक्षण केन्द्र मोहाडी येथे असून या प्रशिक्षण संस्थेचा उद्देशच युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रेरीत करने असा आहे. त्यामुळे ही संस्था चीन, जापान या देशातील शिक्षणाप्रमाणे सर्वाधिक भर प्रात्यक्षिकाकडे देत असल्याने या संस्थेचा प्रशिक्षणार्थी युवक हा आत्मनिर्भर बनूनच येथून बाहेर निघतो. स्व:त व्यवसाय सुरु करु शकतो. आतापर्यंत ६४५ युवकांना या माध्यमातून रोजगार प्राप्त झाला आहे. शासनाच्या अनेक प्रकारच्या प्रशिक्षण संस्था असून तेथून प्रशिक्षण पुर्ण करुन निघालेल्या युवक, युवतींना स्वताचा व्यवसाय उभा करण्यास मोठी अडचन जाते. कारण अश्या संस्थात अभ्यासक्रम हा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे युवक नौकरीच्या शोधात भटकत राहतात. स्टार रोजगार प्रशिक्षण संस्थेत अभ्यासासोबत व्यवसायाचे प्रात्यक्षिकावर जास्त भर दिला जात असल्याने प्रशिक्षार्थी युवक त्या व्यवसायात किंवा ट्रेड मध्ये परफेक्ट बनतो. भंडारा जिल्ह्याची ही एकमेव प्रशिक्षण संस्था असून प्रशिक्षण केन्द्र मोहाडी येथील माविम भवनाच्या प्रशस्त इमारतीत आहे. या संस्थेत दुचाकी वाहन दुरुस्ती, डेअरी फार्मींग, ब्युटी- पार्लर, बकरी पालन, फॅशन डिझायनिंग, शिवणकला, इलेक्ट्रीकल उपकरणे दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, ड्रायव्हींग, रॅक्झीन बॅक बनविणे, मत्स्यपालन इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण सहा ते ३० दिवसांत शिकविल्या जाते. प्रवेश घेण्याच्या संपुर्ण देशातील प्रत्येक जिल्हयात असे एक प्रशिक्षण केंद्र देण्यात आले आहे. हलके वाहन चालविणे (ड्रायव्हिंग) चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
येथे विद्यार्थी शिकत नाही तर घडतात
By admin | Updated: October 5, 2015 01:06 IST