लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नगर परिषद पवनी द्वारा संचालित नगरपरिषद कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले.प्रहार संघटना व बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा या दोन्ही संघटनांच्या नेतृत्वात कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता अकरावी व बारावीतील विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.शिकविण्यासाठी विषय शिक्षक नाहीत. स्वच्छ पिण्याचे पाण्याची व्यवस्था नाही, शाळा सुधार फंडाची रक्कम म्हणून प्रत्येकी रु. १००० प्रवेशाचे वेळी घेण्यात आले. परंतु भौतीक सुविधा देण्यात आलेल्या नाही. डिजीटल वर्गखोली आहे, परंतु विद्यार्थ्यांसाठी वापर होत नाही. छताला असलेले कित्येक पंखे बंद अवस्थेत आहेत. क्रीडांगणाची सुविधा उपलब्ध नाही. तसेच क्रीडा साहित्य नाही. अशा विविध समस्यांसाठी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने चार तास धरणे दिले. दरम्यान मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी आंदोलनस्थळी निवेदन स्वीकारले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.शासनाकडे शिक्षकांची मागणी केलेली आहे. भरती बंद असल्याने शिक्षक नियुक्त करता आले नाही. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी घड्याळी तासीकेवर सात शिक्षक नियुक्त केले आहेत. पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केलेले आहे. न.प. सर्वसाधारण सभेने शाळा सुधार फंड प्रत्येकी रु. १०० घेण्याचा ठराव केलेला आहे. फंडाचा वापर प्रयोगशाळा साहित्य खरेदी व इतर भौतिक सुविधांसाठी करण्यात येणार आहे.-माधुरी मडावी, मुख्याधिकारी, न.प.पवनी
पवनी येथे विद्यार्थ्यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:15 IST
नगर परिषद पवनी द्वारा संचालित नगरपरिषद कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले.
पवनी येथे विद्यार्थ्यांचे धरणे
ठळक मुद्देसुविधांचा बोजवारा : नगर परिषद कनिष्ठ महाविद्यालयातील घटना